शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लपून-छपून प्रेयसीला भेटायला पोहोचला प्रियकर, ग्रामस्थांनी पकडून लावले लग्न, पण सहा तासांनंतर घडले असे काही की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 10:32 IST

Love Marriage News: सदर प्रियकर हा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी लपून-छपून घरात घुसला होता. मात्र तरुणीच्या आईने आरडा-ओरडा केल्याने दोघेही पकडले गेले.

रांची - झारखंडमधील गढवा येथून विवाहाचा एक अजब प्रकार समोर आला आहे. गढवा जिल्ह्यातील मझिआंव बरडिहा पोलीस ठाणे क्षेत्रातील मझिआंव गावामध्ये ग्रामस्थांनी एका प्रेमी युगुलाला पकडून त्यांचे लग्न लावून दिले. मात्र सहा तासांमध्येच या तरुणीला तिच्या माथ्यावर लावलेले कुंकू पुसावे लागले. (Love Marriage News) मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रियकर हा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी लपून-छपून घरात घुसला होता. मात्र तरुणीच्या आईने आरडा-ओरडा केल्याने दोघेही पकडले गेले. मात्र त्यांचे लग्न लावून दिल्यानंतर सदर मुलगा हा अल्पवयीन असल्याचे समजले तेव्हा, सर्वांना धक्का बसला. (Boyfriend Arrived to meet the beloved in secret, The villagers caught both of them and arranged the marriage, It was later revealed that the young man was a minor)

या विवाहाबाबत तरुणीच्या आईने सांगितले की, गुरुवारी रात्री माझ्या घरामध्ये केवालरपुरा गावातील राकेश रजवार यांचा मुलगा चोरासारखा घुसला होता. त्यानंतर मी आरडाओरडा केला. आवाज ऐकून गावकऱ्यांनी धावत येत त्याला पकडले. त्यानंतर जमलेल्या गावकऱ्यांच्या जमावाने गावातील देवीच्या मंडपामध्ये मी नकार देत असतानाही माझ्या मुलीचा सदर तरुणासोबत विवाह लावून दिला.

मुलीची आई म्हणाली की, तिची मुलगी १९ वर्षांची आहे. तर तिचा मुलगा १६ वर्षांचा आहे. तसेच तो मद्यपीही आहे. कुंकू लावल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात गेले पाहिजे, असे सांगितले तेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेलो. तिथे मुलाचे वडील आधीपासून हजर होते. तेव्हा पोलिसांनी मुलीला एका अर्जावर अंगठा लावण्यास सांगितले. तसेच मुलगा अल्पवयीन आहे. त्यामुळे लग्न झाल्यास तो तुरुंगात जाईल, असे सांगितले. आमच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यात आम्ही केस कुठून लढणार असा प्रश्न होता. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना घरी पाठवला. तसेच ग्रामस्थांच्या सांगण्यावरून मी सुद्धा मुलीला लावलेले कुंकू पुसून टाकले.

याबाबत पोलीस म्हणाले की, ही घटना घडल्यानंतर दोन्हीकडचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले होते. तेव्हा आम्ही सदर मुलगी आणि मुलग्याला त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले. यासंदर्भात कुठल्याही पक्षाने लेखी तक्रार केलेली नाही. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड