The boy murdered father, after the post portem the murder was revealed | मुलगाच उठला बापाच्या जीवावर,शवविच्छेदनानंतर झाला हत्येचा खुलासा

मुलगाच उठला बापाच्या जीवावर,शवविच्छेदनानंतर झाला हत्येचा खुलासा

ठळक मुद्देमारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी खोलापुरीगेट पोलिसांनी शुक्रवारी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. मृताच्या भावाची तक्रार व चौकशीअंती कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला व आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अतुल घारपांडे करीत आहेत.  

अमरावती : बाप-लेकांनी सोबत मद्यपानानंतर जेवण केले. यानंतर पलंगावर कोण झोपणार, या वादातून  मुलाने वडिलांना जमिनीवर डोक्यावर आपटले तसेच छातीवर व तोंडावर लाथा घालून संपविल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कांडलकर प्लॉट येथे घडली. मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी खोलापुरीगेट पोलिसांनी शुक्रवारी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. 

पोलीस सूत्रांनुसार, रामदास सदाशिव पाचकवडे (रा. कांडलकर प्लॉट) असे मृताचे, तर भूषण रामदास पाचकवडे (३३) असे आरोपीचे नाव आहे. मृताचे रामदास यांचे बंधू सुनील पाचकवडे ( ५८, रा. वल्लभनगर) यांनी खोलापुरीगेट पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रथम याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावर जखमा आढळून आल्याने पोलिसांनी भूषणला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. मृताच्या भावाची तक्रार व चौकशीअंती कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला व आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अतुल घारपांडे करीत आहेत.  

 पत्नी बाहेर गेल्यानंतर झाला घात 
रामदास पाचकवडे यांची पत्नी घटनेच्या वेळी बाहेर गेली होती. ती कामावरून परत आली तेव्हा पती जमिनीवर निपचित पडलेले आढळले. त्यांना डॉक्टरांकडे नेले असता, मृत घोषित करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या 

 

विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी 

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

 

Web Title: The boy murdered father, after the post portem the murder was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.