शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हिरे व्यापारी भरत शहा यांच्यासह मुलगा, नातवावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 7:44 AM

पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माता भरत शहा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि नातवावर गावदेवी पोलिसांनी शनिवारी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माता भरत शहा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि नातवावर गावदेवी पोलिसांनी शनिवारी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. या प्रकरणी शहा यांचा नातू यश याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.ग्रॅण्ट रोडमधील भुलादेसाई रोडवर असलेला डर्टी बन्स सोबो हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे या पथकाला दिसले. गावदेवी पोलिसांचे एक पथक नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांचे लक्ष या पबकडे गेले. पथकाने नियमानुसार दीड वाजता पब बंद करण्याची विनंती केली. मात्र यश आणि तेथील रोहन पारीख यांनी याकडे दुर्लक्ष करत पब सुरू ठेवला. पोलीस अधिकारी अर्जुन डांगे हे पथकासह रात्री पावणे दोनच्या सुमारास पुन्हा पबवर पोहोचले. त्यांनी पब बंद करण्याची विनंती करताच, येथील ग्राहकांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. पोलीस शिपाई संतोष पवार यांना मारहाणही केली. त्यानंतर, यश त्याच्या मर्सिडीज कारमधून निघून गेला, तर रोहन पारीख याने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांना या दोघांसह अन्य एकाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.याची माहिती मिळताच भरत शहा हे त्यांचा मुलगा आणि यशचे वडील असलेल्या राजीव यांच्यासह गावदेवी पोलीस ठाण्यात पोहोचले. यश याच्याकडे विचारणा करत त्याच्या अटकेवरून या दोघांनीही पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केल्याची माहिती मिळते. पहाटे पाचपर्यंत हा प्रकार सुरू होता. अखेर पोलिसांनी शहा यांच्यासह त्यांचा मुलगा राजीव आणि नातू यश विरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी