युवती सोबतचा व्हिडीओ स्टेटसवर ठेवून केला व्हायरल; आरोपीला अटक
By सदानंद सिरसाट | Updated: August 6, 2022 00:20 IST2022-08-06T00:19:13+5:302022-08-06T00:20:00+5:30
वाडेगावातील युवकाविरूध्द गुन्हा दाखल

युवती सोबतचा व्हिडीओ स्टेटसवर ठेवून केला व्हायरल; आरोपीला अटक
शेगाव (बुलडाणा): लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अतिप्रसंग करणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळलेल्या युवतीने पुन्हा तसे करण्यास नकार दिल्यानंतर युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडीओ WhatsApp स्टेटसवर ठेवून व्हायरल करत बदनामी केली. त्यामुळे पिडीतेने शेगाव शहर ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी युवकाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
शेगाव शहर ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी एका २० वर्षीय युवतीने तक्रार दिली. त्यामध्ये पिडित युवतीची आरोपी युवकासोबत मैत्री झाली. त्याने तीला दर्शनाच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावले. तसेच लग्नाचे आमिष दाखवून शेगावातील मुरली लॉजमध्ये तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून युवतीने त्यास लॉजवर येण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी युवकाने युवतीसोबतचा शारीरिक संबंधाचा व्हिडीओ त्याच्या व्हॉटसअॅप स्टेटसवर ठेवून व्हायरल केला. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रतिक गजानन मानकर (२३), रा. वाडेगाव, ता. बाळापूर याच्याविरूध्द कलम ३७६ (२) (एन), ५०६ भादंवि सहकलम ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ हे करीत आहेत.