शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बियरच्या बाटलीने चिरला गळा, ग्राहकांच्या भांडणात हॉटेल मालकाचा गेला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 20:38 IST

जळगावातील घटना, दोन तासातच संशयित शरण

ठळक मुद्दे याप्रकरणी शनी पेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर हल्लेखोर प्रशांत भिवराज कोळी (रा.तानाजी मालुसरे नगर, जळगाव) हा दोन तासांनी पोलिसांना शरण आला.प्रशांत कोळी याने जेवायला बसलेल्या पंकज व दीपक यांच्याजवळ बियरच्या बाटल्या फोडल्या.

जळगाव - हॉटेलमधील ग्राहकांशी होत असलेला वाद सोडवायला गेलेले हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (४५, रा.असोदा, ता.जळगाव) यांचा बियरच्या बाटल्याने गळ्यावर वार करुन खून केला तर दीपक दिलीप जगताप (३०, रा.अयोध्या नगर, जळगाव) व पंकज सुनील वडनेरे (३०, रा.मयुर कॉलनी, पिंप्राळा) हे दोघं जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता नेरी नाका स्मशानभूमीला लागून असलेल्या असोदा मटण हॉटेलमध्ये घडली. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर प्रशांत भिवराज कोळी (रा.तानाजी मालुसरे नगर, जळगाव) हा दोन तासांनी पोलिसांना शरण आला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत भिवराज कोळी व त्याचा साथीदार महेंद्र अशोक चौधरी हे दोघं शुक्रवारी दुपारी तीन वाजेपासून नेरी नाका स्मशानभूमीनजीक असलेल्या उमेश बियर अ‍ॅण्ड वाईन शॉपवर बाजूला बसून बियर प्राशन करीत होते. दुकान बंद करीत असताना प्रशांत याने मालकाकडे मोफत बियर मागितली असता तेथील एका कर्मचाऱ्याने दुकान बंद होण्याची वेळ झाल्याचे सांगून मोफत बियर देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनी कर्मचाऱ्याशी वाद झाला. हा प्रकार शेजारीच असोदा मटन हॉटेलजवळ जेवायला बसलेले दीपक दिलीप जगताप व पंकज सुनील वडनेरे दोघं बघत असताना प्रशांत कोळी याने ‘तु माझ्याकडे काय पाहतो रे’ असे म्हणत पंकज व दीपक यांच्याकडे मोर्चा वळविला. त्यावेळेत बियर शॉपचे मालक उमाकांत कोल्हे यांनी दुकान बंद करुन पळ काढला.बाटली फोडली अन् मालकाच्या गळ्यावर केले वारप्रशांत कोळी याने जेवायला बसलेल्या पंकज व दीपक यांच्याजवळ बियरच्या बाटल्या फोडल्या. एकाच्या मानेवर तर दुसऱ्याच्या पोटावर मारले. नेमका काय वाद होत आहे हे पाहण्यासाठी मालक प्रदीप चिरमाडे हॉटेलमधून बाहेर धावत आले असता प्रशांत याने त्यांच्या गळ्यावरच फुटलेल्या बियरच्या बाटलीने सपासप वार केले. चिरमाडे यांना तातडीने खासगी दवाखान्यात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. चिरमाडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गिरीश, मुलगी दिशा व भाऊ भानुदास असा परिवार आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

 

काबुल हादरलं!  नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू 

 

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

टॅग्स :MurderखूनhotelहॉटेलPoliceपोलिसJalgaonजळगाव