गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक; सार्वजनिक शौचालयं बनली गुन्हेगारांचे अड्डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 15:41 IST2018-10-29T15:39:35+5:302018-10-29T15:41:25+5:30
शौचालयाच्या गच्चीवरून काल मध्यरात्री २. ३० वाजताच्या सुमारास जयपाल राजपूत याने विनापरवाना गावठी कट्यातुन गोळीबार केला. तर त्याचा दुसरा साथीदार विशाल वाल्मिक याने चॉपर बाळगला. याप्रकाराने परिसरात दहशत पसरली होती.

गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक; सार्वजनिक शौचालयं बनली गुन्हेगारांचे अड्डे
उल्हासनगर - महापालिका सार्वजनिक दुमजली शौचालयाच्या गच्चीवरून गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची झाडाझडती घेण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं -1 शहाड फाटक परिसरात एमएमआरडीएने बांधलेले दुमजली सार्वजनिक शौचालये आहे. पालिका अशा शौचालयाची देखभाल व्यवस्थित करीत नसल्याचा गैरफायदा समाजकंटकांनी घेतला. यातूनच गोळीबाराचा प्रकार झाला आहे. शौचालयाच्या गच्चीवरून काल मध्यरात्री २. ३० वाजताच्या सुमारास जयपाल राजपूत याने विनापरवाना गावठी कट्यातुन गोळीबार केला. तर त्याचा दुसरा साथीदार विशाल वाल्मिक याने चॉपर बाळगला. याप्रकाराने परिसरात दहशत पसरली होती.
शहरातील सार्वजनिक शौचालये गुन्हेगाराचे आश्रयस्थान झाले असून पालिकेने एमएमआरडीएने बांधलेले 180 दुमजली शौचालये ताब्यात घेण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीत शौचालये सामाजिक संस्थेच्या ताब्यातून काढून घेऊन स्वतःकडे घेण्याची मागणी होत आहे. गोळीबारप्रकरणी दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक करून शस्त्र ताब्यात घेतली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.