शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

यू ट्यूब पाहून बनविला बॉम्ब; जिवंत बॉम्ब घेऊन 'तो' पोलीस ठाण्यात पोहोचला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 15:04 IST

Bomb Scare : प्रचंड खळबळ, बीडीडीएसमुळे वाचले अनेकांचे प्राण

ठळक मुद्देनंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात राहुल युवराज पगाडे (वय २५) नामक आरोपी राहतो. नंदनवन पोलिस ठाण्यात एक माथेफिरू जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचल्याचे कळताच शहर पोलिस यंत्रणा हादरली.

नागपूर : जिवंत बॉम्ब घेऊन एक तरुण चक्क पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्याजवळ खराखुरा बॉम्ब असल्याचे कळल्याने पोलीसही हादरले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (बिडीडीएस) पाचारण करण्यात आले. बरेच परिश्रम केल्यानंतर तो बॉम्ब निकामी करण्यात आला. त्यामुळे स्फोटाची घटना टळून अनेकांचे जीव वाचले. नंदनवन पोलिस ठाण्यात शनिवारी हे थरारनाट्य घडले. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात राहुल युवराज पगाडे (वय २५) नामक आरोपी राहतो.

युट्युब वर बॉम्ब कसा बनवायचा, याचे त्याने व्हिडिओ बघितले आणि त्याच्या कुरापती डोक्यात बॉम्ब बनविण्याचा किडा वळवळू लागला. त्यानुसार त्याने बॅटरी, इलेक्ट्रिक सर्किट तसेच इतर साहित्य जमविले आणि बॉम्ब तयार केला. बॉम्ब तयार झाल्यानंतर तो निकामी करण्याचे तंत्र त्याला अवगत नव्हते. बॉम्बचा स्फोट होऊ शकतो आणि आपला जीव जाऊ शकतो, याची त्याला कल्पना आल्याने तो हबकला. काय करावे हे त्याला कळेना. त्यामुळे एका बॅगमध्ये हा जिवंत बॉम्ब ठेवून तो शनिवारी दुपारी सरळ नंदनवन पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याने तेथील पोलीस हवालदार मडावी यांना आपल्याजवळ बॉम्ब असल्याची माहिती दिली. मनोरुग्ण असावा, असे समजून पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याने बॅगमधून बॉम्ब काढून पोलिसांपुढे ठेवला. त्यानंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. ठाणेदार  मुक्तार शेख यांनी लगेच वरिष्ठांना तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला (बीडीएस) माहिती देऊन पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. दोन मिनिटातच संपूर्ण पोलीस ठाणे रिकामे झाले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आरोपीच्या ताब्यातील बॉम्ब बघितला. तो ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेऊन बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट बॅटरी पासून वेगळे करून बॉम्ब निकामी केला. पोलीस यंत्रणेचा जीव भांड्यात  नंदनवन पोलिस ठाण्यात एक माथेफिरू जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचल्याचे कळताच शहर पोलिस यंत्रणा हादरली. अनेक वरिष्ठांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, बॉम्ब निकामी झाल्याचे कळताच अवघ्या पोलीस यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, आरोपी राहुल पगाडेविरुद्ध भारतीय हत्यार कायदा सहकलम १२३तसेच भादविच्या अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या खळबळजनक घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून शनिवारी आणि रविवारी सकाळपर्यंत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती, हे विशेष!

टॅग्स :Bombsस्फोटकेnagpurनागपूरPoliceपोलिसYouTubeयु ट्यूबArrestअटक