बॉम्बच्या अफवेने बोरिवलीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 14:48 IST2019-02-25T14:46:41+5:302019-02-25T14:48:30+5:30
बॉम्बच्या आकाराचं लहान मुलांचं खेळणं असल्याचं निष्पन्न झालं आहे.

बॉम्बच्या अफवेने बोरिवलीत खळबळ
मुंबई - मुंबईतील बोरीवली पश्चिम येथे गोराई डम्पिंग ग्राऊंडमध्ये आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास कचऱ्यात बॉम्ब सदृश वस्तू आढळली असल्याने बोरिवली परिसरात एकच खळबळ माजली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पथकाने तपासणी केली असता बॉम्बच्या आकाराचं लहान मुलांचं खेळणं असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे भयभीत बोरिवलीकरांना सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आज सकाळी गोराईतील कृष्णा मेनन अकादमी ज्युनियर कॉलेजची बस गोराईवरुन मुलांना घेण्यासाठी निघाली होती. त्यावेळी बसमधील महिला तृप्ती गोरक्ष यांच्या नजरेस काहीतरी संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यानंतर शाळा व्यवस्थापकांना फोन करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली. शाळेने पोलीस नियंत्रण कक्षास ही माहिती कळवली आणि घटनास्थळी बीडीडीएस पथक दाखल झालं.