बाॅलिवूडच्या मेकअप आर्टिस्टकडून व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा, गावदेवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:22 IST2025-01-13T06:21:42+5:302025-01-13T06:22:00+5:30

पेडर रोड परिसरात राहणारे विराज विक्रम शहा (वय ४६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Bollywood makeup artist dupes businesswoman of Rs 6 crore, fraud case registered at Gavdevi police station | बाॅलिवूडच्या मेकअप आर्टिस्टकडून व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा, गावदेवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद

बाॅलिवूडच्या मेकअप आर्टिस्टकडून व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा, गावदेवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद

मुंबई : बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट चिराग बामबोटसह एका महिलेविरुद्ध सहा कोटी १५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. पेडर रोड परिसरात राहणारे विराज विक्रम शहा (वय ४६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

त्यांचा इंडस्ट्रिअल केमिकल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, चिराग बामबोट, राकेश शिवा शेट्टी, शेट्टी यांची पत्नी तमसीन शेख आणि अन्य साथीदारांनी चिरागच्या मे. आर्ट बाय चिराग बामबोट एल.एल.पी. या फर्ममध्ये २५ टक्के भागीदारी देतो असे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास सांगितले. यामध्ये त्यांनी एकूण सहा कोटी १५ लाख रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणूक केलेल्या रकमेचा वापर व्यवसायासाठी न करता त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. 

२६ मार्च २०२४ रोजी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार अर्ज सादर केला. त्यानुसार, दिलेल्या जबाबानुसार, नोव्हेंबर २०२१ मध्ये मे. हेवी केमिकल्स काॅर्पोरेशन या फर्मच्या कार्यालयाचे इंटेरिअरचे काम मित्र डरायस बामबोट यांना दिले होते. डरायसने त्यांचा भाऊ चिराग हा मेकअप अर्टिस्ट असून, त्याचा कोविडमुळे व्यवसाय तोट्यात गेला आहे. त्यामुळे चिरागने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगून, त्याला आर्थिक मदतीबाबत विचारणा केली. त्यानुसार त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये चिरागची भेट घेत मदत करण्याचे ठरवत गुंतवणूक करत गेले, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

अशी केली फसवणूक
चिरागने स्किन ट्रिटमेंटचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये शेट्टीची भेट घेतली होती. त्यावेळी चिरागने या व्यवसायात शेट्टी यांचा हातखंडा असून, हा व्यवसाय तेच पाहतील असे सांगितले. 
स्किन ट्रिटमेंटच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीन, इंटेरिअर आणि इतर गुंतवणुकीसाठी लागणारी रक्कम जवळ नसल्याने हेवी केमिकल्स या भागीदारी फर्मच्या नावावर बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून सहा कोटी ४७ लाख ९१ लाख १५६ रुपयांचे कर्ज घेत पैसे दिले. 
स्किन ट्रिटमेंट व्यवसायासाठी फेब्रुवारी ते जुलै २०२३ या कालावधीत मे. हेवी केमिकल्स काॅर्पोरेशन या भागीदारी फर्मने चिराग व तमसीन  यांच्या भागीदारी फर्ममध्ये ६ कोटी १५ लाख रुपये  दिले. मात्र, पुढे ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे म्हटले आहे.

Web Title: Bollywood makeup artist dupes businesswoman of Rs 6 crore, fraud case registered at Gavdevi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.