बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : एनसीबीकडून करिश्मा प्रकाशची कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 06:48 IST2020-11-05T01:55:56+5:302020-11-05T06:48:31+5:30
Bollywood Drugs Connection: करिष्माच्या याचिकेवर ७ नोव्हेंबरला सुनावणी हाेईल, तोपर्यंत तिला अटक न करण्याची सूचना न्यायालयाने दिली. तर चौकशीसाठी ती गैरहजर राहत असल्याची तक्रार एनसीबीने केली होती, त्यावर कोर्टाने हमी दिल्याने ती आज हजर झाली.

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : एनसीबीकडून करिश्मा प्रकाशची कसून चौकशी
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रक विभागाच्या (एनसीबी) समन्सकडे दुर्लक्ष करीत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिने बुधवारी मात्र चौकशीसाठी कार्यालयात हजेरी लावली. तिच्या घरात सापडलेल्या ड्रग्जच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी तिच्याकडे कसून चाैकशी केली. मात्र ती पूर्ण न झाल्याने आवश्यकतेनुसार तिला पुन्हा बोलाविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
करिष्माच्या याचिकेवर ७ नोव्हेंबरला सुनावणी हाेईल, तोपर्यंत तिला अटक न करण्याची सूचना न्यायालयाने दिली. तर चौकशीसाठी ती गैरहजर राहत असल्याची तक्रार एनसीबीने केली होती, त्यावर कोर्टाने हमी दिल्याने ती आज हजर झाली.