झोपेतील पत्नीवर टाकले उकळते पाणी : नागपुरात शंकाखोर पतीचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 21:07 IST2020-02-01T21:05:13+5:302020-02-01T21:07:11+5:30

शंकेखोर पतीने झोपलेल्या पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची घटना मानकापूरच्या जयदुर्गानगर सोसायटीत घडली.

Boiling water thrown at a sleeping wife: An act of a suspicious husband in Nagpur | झोपेतील पत्नीवर टाकले उकळते पाणी : नागपुरात शंकाखोर पतीचे कृत्य

झोपेतील पत्नीवर टाकले उकळते पाणी : नागपुरात शंकाखोर पतीचे कृत्य

ठळक मुद्देमानकापुरातील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शंकेखोर पतीने झोपलेल्या पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची घटना मानकापूरच्या जयदुर्गानगर सोसायटीत घडली.
सूरज यादव (५०) रा. गाडरवाडा, मध्यप्रदेश असे या शंकेखोर पतीचे नाव आहे. तो मजुरी करतो. त्याचे ३० वर्षाच्या लक्ष्मीसोबत प्रेमसंबंध होते. १२ वर्षांपासून तो लक्ष्मीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतो. काही दिवसांपासून दोघे जयदुर्गानगर येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या परिसरात झोपडीत राहतात. यादव रागीट आणि शंकेखोर आहे. तो नेहमीच लक्ष्मीशी वाद घालत होता. त्याला तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. काही दिवसापासून तो तिला त्रास देत होता. २९ जानेवारीला सकाळी मोबाईलवरून दोघात वाद झाला. यादवने लक्ष्मीला बेदम मारहाण केली. त्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे लक्ष्मी त्यावेळी शांत राहिली. रात्री २.३० वाजता लक्ष्मी झोपडीत झोपली होती. यादवने झोपेतच तिच्या अंगावर उकळते पाणी टाकले. त्यात लक्ष्मी गंभीररीत्या भाजली. तिला त्याच अवस्थेत सोडून तो पळून गेला. लक्ष्मीची आरडाओरड ऐकू न परिसरातील नागरिक तिच्या मदतीसाठी धावले. त्यांनी तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात पोहोचविले. या प्रकरणी यादवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Boiling water thrown at a sleeping wife: An act of a suspicious husband in Nagpur