Boiling oil thrown on brother's body; Sister's act in anger, brother injured | उकळते तेल भावाच्या अंगावर फेकले; रागाच्या भरात बहिणीचे कृत्य, भाऊ जखमी

उकळते तेल भावाच्या अंगावर फेकले; रागाच्या भरात बहिणीचे कृत्य, भाऊ जखमी

कल्याण : रागाच्या भरात बहिणीने उकळते तेल भावाच्या अंगावर फेकल्याने तो जखमी झाल्याची घटना ९ ऑक्टोबरला सकाळी पूर्वेतील तिसगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी जखमी भाऊ विजय कांबळे यांनी कोळसेवाडी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बहीण राजश्री हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पतीबरोबर फारकत घेतल्याने राजश्री चार वर्षापासून विजय यांच्याकडे राहायला आहे. तणावात त्या एकदा घरातून निघून गेल्या होत्या. त्यावेळी विजय यांनी त्यांना पुन्हा घरी आणले होते. याचा राग राजश्रीला होता. दरम्यान, ९ ऑक्टोबरला त्या स्वयंपाकघरात मासे तळत होत्या. त्यावेळी मसाल्यामुळे घरातील इतर मंडळींना ठसका लागत होता. विजय आणि त्यांच्या आईने यामुळे त्रस होत असल्याचे राजश्री हिला सांगितले. मात्र, याचा राग तिला आला. त्यातून तिने कढईतील उकळते तेल विजय यांच्या अंगावर फेकले. त्यामुळे विजय यांच्या कपाळाला, डाव्या हाताला, डोक्यावर दुखापत झाली आहे.

Web Title: Boiling oil thrown on brother's body; Sister's act in anger, brother injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.