शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भांडणाच्या रागातून पतीवर पत्नीने ओतले उकळलेलं पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 23:40 IST

ती रागाच्या भरात स्वयंपाकघरात गेली आणि थोड्यावेळाने शहेनाझने उकळलेले पाणी पतीच्या अंगावर ओतले.

ठळक मुद्देबोरीवली पश्चिमेला एका ६२ वर्षीय महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीच्या अंगावर उकळलेले पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी शेहनाझविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, ३३८, आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र या लॉकडाऊन दरम्यान कौटुंबिक हिंसाचार वाढताना दिसत आहे. क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या, मारहाण केल्याच्या हिंसक घटना समोर येत आहे. दरम्यान, बोरीवली पश्चिमेला एका ६२ वर्षीय महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीच्या अंगावर उकळलेले पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती हॉलमध्ये झोपले होते आणि पत्नीने पतीला बेडरूममध्ये झोपायला सांगितले. त्याचवेळेस दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर पतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पतीने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळल्यानंतर यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित पती ए.ए. दळवी आणि त्यांची पत्नी शहेनाझ ओल्ड एमएचबी कॉलनीमध्ये राहतात. शहेनाझ ही नेहमीच क्षुल्लक कारणांवरून भांडत असते. शहेनाझच्या या वागणूकीमुळे त्यांचा मुलगा देखील काही वर्षांपूर्वी घर सोडून गेला, असे पतीने तक्रारीत सांगितले. पतीच्या तक्रारीनुसार, ७ मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आपल्या फ्लॅटमधील हॉलमध्ये झोपत होते. दरम्यान, शहेनाझने त्यांच्यावर आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि बेडरूममध्ये झोपायला सांगितले. मात्र, शहेनाझच्या बोलण्याकडे पतीने लक्ष दिले नाही. काही वेळाने ती शिवीगाळ करू लागली. नंतर पतीने शहेनाझला ओरडल्यामुळे झोप येत नसल्याचे सांगून गप्प राहण्यास सांगितले. त्यावेळी ती रागाच्या भरात स्वयंपाकघरात गेली आणि थोड्यावेळाने शहेनाझने उकळलेले पाणी पतीच्या अंगावर ओतले.यामुळे पतीची छाती, घसा आणि हात भाजले आहे. पोलिसांनी सांगितले की, पतीला तातडीने कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला कपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तीन दिवसांनी दळवी यांना डिस्चार्ज मिळाला. नंतर शहेनाझविरोधात पतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शेहनाझविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, ३३८, आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एमएचबी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले की, अद्याप या प्रकरणाची चौकशी करत असल्यामुळे कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे. सध्या दोघेही पती-पत्नी एकत्र राहत आहेत.

आणखी बातम्या वाचा...

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस