शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील स्वच्छतागृहात आढळला मृतदेह; राज्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 14:24 IST

कोरोनाच्या रुग्णालयातून २ जूनपासून ही महिला बेपत्ता होती.

जळगाव : भुसावळ येथील बेपत्ता झालेल्या ८२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णालयाच्या स्वच्छता गृहात ही महिला मृतावस्थेत आढळली. त्यामुळे या रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालती चुडामण नेहते असे या महिलेचे नाव आहे.

कोरोनाच्या रुग्णालयातून २ जूनपासून ही महिला बेपत्ता होती. या महिलेच्या नातेवाईकांनी शनिवारी सायंकाळी पोलिसात तक्रार दिली होती. १ जून रोजी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना भुसावळ येथील रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जळगावच्या कोरोना रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. भुसावळ येथून त्यांचे नाव चुकीचे पाठवण्यात आल्याने कोरोना रुग्णालयात त्यांच्या नावाची नोंद मालती सुदाणे अशी झाली आहे. 

पुन्हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार,  २ जून रोजी ही महिला बेपत्ता असल्याची माहिती त्यांना येथील डॉक्टरांनी दिली होती. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी आपण चुकून त्यांना संशयितांच्या कक्षात दाखल केले होते, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी नातेवाईकांनी फोन केला असता त्या बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र त्या कुठेच सापडल्या नाहीत.

विशेष म्हणजे त्यांचा मृतदेह त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात सापडावा अन् दुर्गंधी येईपर्यंत त्याबाबत कुणाला काहीच कळू नये, यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगावDeathमृत्यू