Youtuber Vaishnavi Death news: २० वर्षांची वैष्णवी युट्यूबर म्हणून प्रसिद्ध झाली होती. तिचे २४ वर्षीय गंदाम हरी यांच्यासोबत लग्न झाले होते आणि सध्या ती तीन महिन्यांची गर्भवती होती. मंगळवारी पहाटे वैष्णवीची पतीनेच हत्या केली. पालकांना रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सर्वत्र खळबळ माजली.
चित्तारी वैष्णवी जगटियल जिल्ह्यातील मधापूर गावात पतीसोबत राहत होती. युट्यूबवर ५० हजार सब्सक्राइबर्स असलेली वैष्णवी दररोजच्या आयुष्यातील आणि कुटुंबातील वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ पोस्ट करायची. वैष्णवीची हत्या झाल्यापासून तिचा पती फरार आहे.
शरीरावर अनेक वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
वैष्णवीच्या आईवडिलांना तिच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह मिळाला. तिच्या डोक्यावर, मानेवर, हातावर धारदार हत्याराने असंख्य वार केलेले आढळून आले. तिचा पती हरी हा घरातून फरार झालेला होता. हरीने सोमवारी मध्यरात्रीच वैष्णवीची हत्या केली आणि फरार झाला, असा संशय पोलिसांना आहे.
हरी काय काम करतो?
हरी स्थानिक शासकीय रुग्णालयात रिसेप्शनिस्ट नोकरी करत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडली आणि वैष्णवीसोबतच तो व्हिडीओ करू लागला.
पोलिसांनी सांगितले की, दोघांमध्ये वादाची सुरूवात गेल्या महिन्यापासून झाली. तिने हरीवर हुंडा घेतल्याचे आणि छळ करत असल्याचे आरोप केले. शेजाऱ्यांनी सांगितले की, त्या दोघांमध्ये सातत्याने भांडणं होत होती. सोमवारी रात्रीही त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं.
दहा महिन्यांपूर्वी केलं होतं लग्न
मेतापल्लीचे पोलीस उपअधीक्षक ए. रामुलू सांगितले की, दहा महिन्यांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. दोघांचीही जात एक आहे, पण हरीच्या आईवडिलांना हे लग्न मान्य नव्हते. त्यावरूनच दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरू झाले होते.
वैष्णवी सुरूवातीला हरीच्या आईवडिलांसोबत राहत होती. दोघेही काही महिने तिथे राहिल्यानंतर वैष्णवीच्या घरी राहायला आले. दोन्ही कुटुंबातील सततच्या वादामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता.
सोमवारी रात्री झालेल्या हत्येच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घरी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, सध्या हरीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
Web Summary : Youtuber Vaishnavi, three months pregnant, was murdered by her husband, Hari. She was found in a pool of blood with multiple stab wounds. Disputes over dowry and family issues are suspected motives. Hari is absconding; police are investigating.
Web Summary : यूट्यूबर वैष्णवी, जो तीन महीने की गर्भवती थी, की हत्या उसके पति, हरि ने कर दी। वह खून से लथपथ पाई गई, शरीर पर कई घाव थे। दहेज और पारिवारिक विवादों का संदेह है। हरि फरार है; पुलिस जांच कर रही है।