शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 19:58 IST

 थंपी हे बँकेतून निवृत्त झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.  

ठळक मुद्देपोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार थंपी यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या डोक्याच्या मागील भागास दुखापत झाल्याचे समोर आलं. दारू पिऊन आल्यानंतर अश्विन आणि वडील थंपी यांच्यात वादविवाद झाला होता.

माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी (६४) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी हत्येच्या आरोपीखाली केरळपोलिसांनी थंपी यांच्या मुलाला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार थंपी यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या डोक्याच्या मागील भागास दुखापत झाल्याचे समोर आलं. त्यानंतर, थंपी यांचा मुलगा अश्विनने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झालं

शनिवारी जेव्हा हे हत्याकांड घडले तेव्हा अश्विन मद्यधुंद अवस्थेत होता. मद्यधुंद असताना अश्विनने वडिलांची हत्या केली. याबाबत पोलिसांनी अश्विनकडे चौकशी केली असता त्याने मला फक्त मी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आठवतंय, बाकी काही आठवत नाही असे सांगितले. या हत्याकांडात अजून कोणाचा सहभाग आहे का? याबाबत अश्विनकडे चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अश्विनला कोर्टात हजर केले जाईल. 

 

दारू पिऊन आल्यानंतर अश्विन आणि वडील थंपी यांच्यात वादविवाद झाला होता. पोलिसांना संशय आहे की, थंपी यांना मुलाने ढकल्याने गंभीर जखमी झाले असावेत. घरकाम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, या वडील आणि मुलात वारंवार भांडणं होत असत. केरळ पोलिसांनी मंगळवारी थंपी यांच्या मृत्यूप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. थंपी यांचा मृत्यू ढकल्याने पडून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत. थंपी यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा मुलगा अश्विन घरीच होता. वडील झोपले होते. त्यानंतर मी घरातून निघालो असे अश्विनने पोलिसांना सांगितले. तळमजल्यावरून दुर्गंधी येत असल्याबाबत तक्रार शेजाऱ्यांनी दिल्यानंतर पोलिसांना राहत्या घरात थंपी यांचा मृतदेह आढळला. थंपी हे बँकेतून निवृत्त झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.  

 

असला कसला अंधविश्वास, कोरोनाला पळवण्यासाठी दिला चक्क ४०० बकऱ्यांचा बळी

 

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपशब्द, पोलीस ठाण्यात तक्रार

 

अस्तनितले साप! भारतीय सैन्यात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी, दोघांना अटक

 

अर्णब गोस्वामी एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर 

 

खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

 

‘तू मुझे जानता नही, मै...असं म्हणत पोलिसाला मारहाण करून केले गंभीर जखमी

 

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूKeralaकेरळPoliceपोलिसArrestअटक