शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला महिला पोलिसाचा मृतदेह 

By पूनम अपराज | Published: January 11, 2021 8:10 PM

Suicide Case : माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिकारी उर्मिलाच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देमोहनलालगंजच्या पोलिसांनी सांगितले की, उर्मिला मूळची अयोध्या जिल्ह्यातील आहे. रात्री 10 वाजेपासून ती ड्युटीवर होती.

मोहनलालगंज कोतवालीच्या पीआरव्ही (पोलिस रिपोर्टिंग व्हेइकल) मध्ये तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला वर्मा (वय 24) यांनी रविवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. ती शहरातील मऊ भागात वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिकारी उर्मिलाच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. 

मोहनलालगंजच्या पोलिसांनी सांगितले की, उर्मिला मूळची अयोध्या जिल्ह्यातील आहे. रात्री 10 वाजेपासून ती ड्युटीवर होती. मात्र ती ड्युटीवर पोहचली नव्हती. इतक्यात तिच्या वसतिगृहातील एक ओळखीचा माणूस आला आणि खोलीचा दरवाजा बराच वेळ ठोठावत राहिला. जेव्हा दार उघडले नाह तेव्हा त्याने बाजूच्या एका महिला नर्सला सांगितले. महिला पोलीस अधिकाऱ्याने खोलीच्या दुसऱ्या दारातून आतील बाजूस पाहिले तेव्हा उर्मिलाचा मृतदेह ओढणीने पंखावर लटकलेला पाहून ती स्तब्ध झाली.त्यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. यानंतर एसीपी प्रवीण मलिक, डीसीपी दक्षिण रवि कुमार घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरवण्यात आला. उर्मिलाच्या घरातील सदस्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. उर्मिलाच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. तिचा मोबाइलही योगायोगाने सापडला नाही. मोबाइलचा तपास केला जात आहे. याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांचा शोध घेण्यात येत आहे. उर्मिलाचे कुटुंब आल्यावरच काही माहिती मिळेल.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश