शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह; बलात्कार झाल्याचा वडिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 16:33 IST

Murder And Rape Case : घटनेची माहिती मिळताच भीमा आर्मीचे सदस्य पीडितेच्या गावी पोहोचले आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली.

ठळक मुद्देमाहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आणि तपास सुरू केला

अमेठी - अमेठी येथील जामो पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची हत्या करून बलात्कार केल्याची घटना घडली. मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. घटनेची माहिती मिळताच भीमा आर्मीचे सदस्य पीडितेच्या गावी पोहोचले आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली.जामो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड्यातील रहिवासी सांगतात की, पीडित 12 वर्षाची मुलगी गुरुवारी संध्याकाळी बकरी चरायला गेली होती. ती घरी परत आली नाही तेव्हा कळले की, तिचा मृतदेह सीगो तालाजवळ एका झाडाला लटकलेला आहे.वडिलांचा आरोप - कुणीतरी मुलीची हत्या करुन मृतदेह लटकवला 

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आणि तपास सुरू केला. जामो पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अंगद सिंह म्हणाले की, तपासणीनंतरच घटनेची कारणे शोधू शकू. अल्पवयीन पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, "कुणीतरी मुलीची हत्या केली आणि नंतर तिला फासावर लटकवले , तिच्या शरीरावर जखमा आहेत आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव होत आहे". मृत मुलीचे वडील म्हणाले की, "कोणीतरी तिच्या मृतदेहाला फासावर लटकवले. कारण झाड सरळ आहे आणि तिथे त्या झाडाला फांद्या नाही आहेत. ज्यावर ती बसून स्वतःला लटकवायला झाडावर चढू शकेल."

भीम आर्मीच्या नेत्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहेवडिलांनी असेही म्हणाले होते की, "आमचे कोणाशीही वैर नव्हते, आम्हाला अशी शंका येते की, मुलीसोबत काही वाईट कृत्य केले गेले आहे आणि तिला ठार मारले गेले आणि फासावर लटकवण्यात आले." घटनेची माहिती मिळताच भीम आर्मीचे नेते आनंदसिंग व इतर पीडित मुलीच्या गावी पोहोचले. त्यांनी जामो पोलिस स्टेशन गाठले आणि स्थानिक पोलिसांना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली.

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ