एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह, २ लेकींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 20:45 IST2020-12-03T20:44:42+5:302020-12-03T20:45:26+5:30
Suicide : याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे.

एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह, २ लेकींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज
कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरातील खान गल्लीत आज एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले. ४५ वर्षीय अजगर अली जब्बार अली नावाच्या वडिलांनी दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे.
मुंबई : कांदीवलीमध्ये एकाच घरातील तिघांची आत्महत्याpic.twitter.com/lfIqnmrLlQ
— Lokmat (@MiLOKMAT) December 3, 2020
१२ वर्षीय कैनन आणि ९ वर्षीय सुजैन अशी या दोन मुलींची नावे असल्याचे समजते आहे. वडील लोहार काम करायचे. घरी आल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे. मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना एकूण ४ मुली आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अजगर अली जब्बार अली यांनी दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला होता. तसेच एक मुलगी जमिनीवर तर दुसरी मुलगी ही खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. घटनास्थळी कांदिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हजर असून अधिक तपास चालू आहे.