४० वर्षीय तलाठी अन् २० वर्षीय कॉलेज तरूणीचा मृतदेह सापडला; आत्महत्येचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:35 IST2025-06-24T12:24:17+5:302025-06-24T12:35:18+5:30
कोकणकड्याजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला.

४० वर्षीय तलाठी अन् २० वर्षीय कॉलेज तरूणीचा मृतदेह सापडला; आत्महत्येचा संशय
श्रीगोंदा (अहिल्यानगर) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) यांचा समावेश आहे यांनी आत्महत्या केली आहे.
दोघे काही दिवसांपासून बेपत्ता होते. रामचंद्र पारधी यांच्या बेपत्तापणाबाबत त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, तर रूपालीच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता.
स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास रिव्हर्स वॉटरफॉलजवळ उभी असलेली पांढऱ्या रंगाची कार आणि कड्याजवळ आढळलेल्या चपलांमुळे संशय बळावला. रविवारी (22 जून) शोध मोहीम सुरू झाली, मात्र खराब हवामानामुळे थांबवावी लागली. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह सुमारे 1200 फूट खोल दरीतून बाहेर काढले.
शवविच्छेदनासाठी मृतदेह श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.
संतोष पारधे यांना गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामासाठी पाठवले होते. त्यानंतर कामावर येत नव्हते. आणि नंतर त्यांनी एका तरुण मुलीसह आत्महत्या केली या आत्महत्येचे खरे कारण समजले नाही. मात्र अनैतिक संबंधातून जीवनयात्रा संपवली हे दिसत आहे.