Black Money: इंजिनियर निघाला धनकुबेर, छापेमारीमध्ये घरात सापडले घबाड, रोख रक्कम आणि कागदपत्रे जप्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 09:12 AM2021-08-30T09:12:09+5:302021-08-30T09:12:54+5:30

Black Money: ग्रामीण कार्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधीक्षण अभियंत्याच्या दरभंगा आणि पाटणा येथील घरांवर मुझफ्फरपपूर पोलिसांनी छापा टाकला. (Black Money) या छाप्यामध्ये लाखोंचे घबाड पोलिसांच्या हाली लागले आहे.

Black Money: Engineer goes to Dhankuber, burglary found in house, cash and documents seized | Black Money: इंजिनियर निघाला धनकुबेर, छापेमारीमध्ये घरात सापडले घबाड, रोख रक्कम आणि कागदपत्रे जप्त  

Black Money: इंजिनियर निघाला धनकुबेर, छापेमारीमध्ये घरात सापडले घबाड, रोख रक्कम आणि कागदपत्रे जप्त  

Next

पाटणा - बिहारमधील दरभंगा येथील ग्रामीण कार्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधीक्षण अभियंत्याच्या दरभंगा आणि पाटणा येथील घरांवर मुझफ्फरपपूर पोलिसांनी छापा टाकला. (Black Money) या छाप्यामध्ये लाखोंचे घबाड पोलिसांच्या हाली लागले आहे. दरभंगा येथील बहरेटा येथील भाड्याच्या घरामधून ४९ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले. तसेच संपत्तीसंबंधीची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्याबरोबरच पोलिसांनी या अभियंत्याचा लॅपटॉपही जप्त केला आहे. आतापर्यंत त्याच्याकडून एकूण ६७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ( Engineer goes to Dhankuber, burglary found in house, cash and documents seized)

एसएसपी जयंतकांत यांच्या आदेशान्वये एएसपी (वेस्ट) सय्यद इम्रान मसून यांनी पथकासह शनिवारी संध्याकाळी अभियंत्याच्या दरभंगा येथील खासगी निवासस्थानावर छापेमारी केली. तेथून ४८ लाख रुपये रोख आणि संपत्तीची कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर चौकशी करण्यात आली.

तसेच या इंजिनियरचे पाटणामधील जगदेव पथ आणि वेटनरी कॉलेजजवळ दोन फ्लॅट आहेत. तिथेही पथकाने छापे टाकले. मात्र तेथून काहीही हाती लागले नाही. वेटनरी कॉलेज रोडवर असलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांना केवळ इंजिनियरची पत्नी आढळून आली. त्याशिवाय या पथकाने खगडिया येथील या इंजिनियरच्या वडिलोपार्जित घरामध्येही शोधमोहीम राबवली.

कुढनी ठाण्यामध्ये प्राप्तिकर विभाग आणि आर्थिक अपराध शाखेच्या टीमने चौकशी सुरू केली आहे. एएसपी वेस्ट सय्यद इम्रान मसूद यांनी सांगितले की, प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. यामध्ये जमिनीशी संबंधित काही कागदपत्रे सापडली आहेत. अन्य कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. चौकशीमध्ये अभियंत्याने सांगितले की, तो दरभंगा येथून रोख रक्कम घेऊन पाटणा येथील निवासस्थानी जात होता, तेव्हाच पोलिसांनी त्याला रस्त्यात पकडले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम त्याने अवैध पद्धतीने कमावली होती. त्याने कोट्यवधीची संपत्ती जमवलेली आहे. त्याच्या बँक अकाऊंटबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच त्याची सविस्तर माहिती शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एएसपी (वेस्ट) यांनी सांगितले की, त्यांची पत्नी आणि नातेवाईकांच्या खात्याचीही तपासणी होणार आहे. तसेच अवैध संपत्तीची माहिती मिळाल्यावर आर्थिक गुन्हे शाखा जप्त करेल.

पोलिसांनी दरभंगा येथील इंजिनियरच्या क्वार्टरवर छापेमारी केली तेव्हा खोलीत एक कपाट मिळाले. त्याची चावी घेऊन हे कपाट खोलले असता. त्यामधून रोख रक्कम सापडली. ही रक्कम अवैध पद्धतीने कमावलेली असावी, असा कायास लावण्यात येत आहे.  

Web Title: Black Money: Engineer goes to Dhankuber, burglary found in house, cash and documents seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app