भाजपाच्या युवा नेत्याला पोलिसांनी केली अटक; कारमधून घेऊन जात होती कोकेन
By पूनम अपराज | Updated: February 19, 2021 22:29 IST2021-02-19T21:52:22+5:302021-02-19T22:29:19+5:30
BJP youth leader arrested : न्यू अलीपूर भागातील एनआर ऍव्हेन्यू येथून पोलिसांनी तिचा मित्र प्रबीर कुमार डे याला अटक केली.

भाजपाच्या युवा नेत्याला पोलिसांनी केली अटक; कारमधून घेऊन जात होती कोकेन
भाजपच्या युवा नेत्या पामेला गोस्वामी यांना शुक्रवारी पोलिसांनीअटक केली. ती आपल्या गाडीतून कोकेन घेऊन जात होती. न्यू अलीपूर भागातील एनआर ऍव्हेन्यू येथून पोलिसांनी तिचा मित्र प्रबीर कुमार डे याला अटक केली.
भाजपा युवा मोर्चाची पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याचे सरचिटणीस पामेला गोस्वामी याला कोलकाताच्या न्यू अलीपूर येथून लाखो रुपयांच्या कोकेनसह अटक करण्यात आली. महिला नेत्याच्या गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध ड्रग्स सापडली. भाजपा नेत्यांना न्यू अलीपूर येथून अटक करण्यात आली. भाजपा नेत्या पामेला यांच्या अंमली पदार्थांबद्दल पोलिसांना आधीच माहिती होती. पामेलाचे निकटवर्तीय आणि भाजपा नेते प्रबीर कुमार डे यालाही अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासणी दरम्यान न्यू अलिपूरमधील रस्त्यावर पोलिसांनी तिची गाडी थांबविली आणि झडती घेतली असता पामेलाच्या बॅग आणि कारमधून 100 ग्रॅम कोकेन जप्त केले. पकडलेल्या कोकेनची किंमत बाजारात सुमारे लाखो रुपये आहे. तिच्याबरोबर केंद्रीय सुरक्षा दलात तैनात असलेला सैनिकही होता. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.