भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केला हल्ला, एकजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:00 PM2021-01-11T17:00:32+5:302021-01-11T17:01:09+5:30

Attack On Police In Powai : पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.

BJP workers attack on police in powai, one injured | भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केला हल्ला, एकजण जखमी 

भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केला हल्ला, एकजण जखमी 

Next
ठळक मुद्देमुख्य आरोपी दिपू तिवारी व आयुष राजभर यांचा शोध सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हे सर्व भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

मुंबई - पवई परिसरात मोटर सायकलवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. या तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. ज्यात पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.

याप्रकरणी सचिन तिवारी नामक इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी दिपू तिवारी व आयुष राजभर यांचा शोध सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हे सर्व भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

Web Title: BJP workers attack on police in powai, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.