अंबरनाथ : लॉकडाऊनच्या काळात गरीब महिलेला धान्य देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजपच्या एका पदाधिकाऱ्यास शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली. सुनील वाघमारे हे आरोपीचे नाव असून, गुन्हा दाखल होताच, तो पोलीस ठाण्यातून निसटला होता.अंबरनाथ पूर्व भागात एका महिलेवर लॉकडाऊनच्या काळात सुनील वाघमारे याने बलात्कार केल्याचा आरोप होता. त्यानंतर, बंडखोरीच्या वादातून त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याने एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आली होती. त्यानुसार, शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वाघमारे याला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, गुन्हा दाखल होत असल्याचे लक्षात घेताच, त्याने पोलिसांना चकमा देत पळ काढला होता.
बलात्काराच्या आरोपाखाली भाजप पदाधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 05:51 IST