शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
4
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
5
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
6
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
7
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
8
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
9
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
10
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
12
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
13
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
14
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
15
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
16
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
17
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
18
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
19
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
20
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

विषारी दारू प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांनी गमावला होता जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 12:42 PM

BJP Rishi Sharma : अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने (Aligarh Poison Liquor) 108 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने तब्बल 108 जणांचा बळी घेतला आहे. अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने (Aligarh Poison Liquor) 108 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याप्रकरणी आता मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऋषी शर्मा (Rishi Sharma) असं या मुख्य आरोपीचं नाव असून तो भाजपाचा नेता असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी सकाळी बुलंदशहर बॉर्डरवरुन अटक केली आहे. 

पोलिसांनी शर्मा याची माहिती देणाऱ्यांसाठी एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. याआधी शनिवारी 25 हजारांचं बक्षीस जाहीर केलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर, भाजपा नेता ऋषी शर्माचं अवैध फार्म हाऊस जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त करण्यात आलं होतं. विषारी दारूमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतच आहे. प्रकरणाचा तपास वेगानं होऊ लागताच माफियांनी कारवाईच्या भीतीनं विषारी दारू कालव्यात ओतून दिली. यानंतर सर्वात आधी जवां कालव्यातील विषारी दारू प्यायल्यानं 10 कामगारांचा मृत्यू झाला. अकराबादमध्ये शेखा कालव्यात मिळालेली दारू प्यायल्यानं कामगारांची प्रकृती बिघडली आहे. 

शनिवारी बिहारमधील पाच कामगारांचा जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी दारू प्रकरणात फरार असलेला आरोपी भाजपा नेता बीडीसी ऋषी शर्मा याच्या जवां ठाण्याच्या क्षेत्रातील फार्महाऊसवर शनिवारी प्रशासनाने जेसेबीच्या सहाय्यानं कारवाई केली. एसडीएम कोल रंजीत सिंह यांच्या नेतृत्वातील टीमनं ही कारवाई केली. या फार्महाऊसचा काही भाग सरकारी जमिनीवर असल्याचंही तपासात समोर आलं आहे. जवां आणि अकराबाद क्षेत्रात कॅनलमध्ये वाहून आलेली अवैध दारू प्यायल्यानं अनेक लोकांनी जीव गमावला आहे. 

गंगा कालव्याची साफसफाई करण्याबरोबरच पाटबंधारे विभाग अवैध दारू शोधून नष्ट करेल. दोन दिवस हा कालवा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला डीएम यांनी दिल्या आहेत. विभाग कालवा बंद करुन साफसफाई करेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गावच्या सरपंचांनी ऑक्टोबर 2020 मध्येच तक्रार देऊन हा दारूचं हे दुकान बंद करण्याची मागणी केली होती. मात्र तो बंद झाला नाही आणि आता 108 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलीगडमधील करसुआ गावात विषारी देशी दारूची विक्री केली जात आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसArrestअटक