यवतमाळात आठ आरोपींना जन्मपेठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 14:47 IST2019-04-12T14:45:24+5:302019-04-12T14:47:15+5:30

हनीसिंग खून प्रकरण : २०१६ चे प्रकरण, चौघे अद्याप फरार 

The birthplace of eight accused in Yavatmal | यवतमाळात आठ आरोपींना जन्मपेठ

यवतमाळात आठ आरोपींना जन्मपेठ

ठळक मुद्देया प्रकरणात शुक्रवारी न्या. अकाली यांनी आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या घटनेतील चार आरोपी गेल्या तीन वर्षात पोलिसांच्या हाती लागले नाही.

यवतमाळ - येथील पाटीपुरा भागात तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका युवकाच्या खुनात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अकाली यांनी शुक्रवारी आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 
अनिल विजय थूल उर्फ हनिसिंग रा. पाटीपुरा असे यातील मृताचे नाव आहे. त्याच्या एका साथीदाराच्याही खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. २०१६ मध्ये खुनाची ही घटना घडली होती. या प्रकरणात शुक्रवारी न्या. अकाली यांनी आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या घटनेतील चार आरोपी गेल्या तीन वर्षात पोलिसांच्या हाती लागले नाही. शिवाय दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

Web Title: The birthplace of eight accused in Yavatmal