शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

लघुशंका करण्यास हटकत मारहाण केल्याच्या रागातून दुचाकी जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 20:27 IST

Crime News: डिलोन डॉमनिक हेन्ड्रिक्स हे उत्तनच्या शिरे मार्गावरील मोठा क्रॉस जवळ राहतात. मंगळवारी रात्री त्यांच्या दुचाकी जवळ एका अनोळखी तरुण लघुशंका करत होता .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - दुचाकी जवळ लघुशंका करत असलेल्या तरुणास हटकले व मारहाण केली याचा राग ठेऊन त्या तरुणाने तीन दुचाकींवर ज्वलनशील द्रव्य टाकून त्यातील एक दुचाकी पेटवून दिल्याची घटना भाईंदरच्या उत्तन भागात घडली आहे . 

डिलोन डॉमनिक हेन्ड्रिक्स हे उत्तनच्या शिरे मार्गावरील मोठा क्रॉस जवळ राहतात . मंगळवारी रात्री त्यांच्या दुचाकी जवळ एका अनोळखी तरुण लघुशंका करत होता . त्यावेळी त्या तरुणास एकाने लघुशंका करू नको सांगत हटकले व मारहाण केली . त्या नंतर तो तरुण तेथून निघून गेला . 

परंतु मध्यरात्री अडीचच्या सुमारास हेन्ड्रिक्स यांच्या शेजाऱ्याने त्यांना उठवले व तुमची दुचाकी पेटत असल्याचे सांगितले . दुचाकीला आग लागल्याचे पाहून हेन्ड्रिक्स आदींनी पाण्याचा मारा करून आग विझवली . पण तो पर्यंत दुचाकी जळून गेली होती . तसेच लगतच्या अन्य दुचाकींवर देखील ज्वलनशील द्रव्य टाकण्यात आल्याचे आढळून आले .

या प्रकरणी सीसीटीव्ही तपासले असता मध्यरात्री दोनच्या सुमारास तोच लघुशंका करणारा तरुण हेन्ड्रिक्स यांच्या घरा जवळ येताना व जाताना दिसून आला . या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा आहेत . सदर आगीत दुचाकीचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे . तर आरोपी तरुण हा मच्छीमार बोटीवरील खलाशी असून तो या भागात बेकायदा चालणाऱ्या दारूच्या गुत्त्यावर मद्यपान करण्यासाठी आला होता असे सूत्रांनी सांगितले . 

टॅग्स :bikeबाईकfireआग