शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पहिल्यांदा बिअर पाजली, मग लोखंडी रॉडनं हल्ला अन् शेवटी मरेपर्यंत ट्रकखाली चिरडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 15:31 IST

पोलिसांनी या घटनेनंतर नफीसला अटक केली आहे. चौकशीत त्याने हत्येची धक्कादायक कबुली दिली आहे.

ठळक मुद्दे नॅशनल हायवे ७४ वर जिकरी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत आढळला होता. मनप्रीतच्या या धमकीला वैतागून नफीसनं तिचा काटा काढण्याचं ठरवलं. हत्येला रस्ते अपघात दाखवण्यासाठी नफीसनं मनप्रीतचा मृतदेह तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत चाकाखाली चिरडला.

उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात पोलिसांनी एका हत्येचा धक्कादायक खुलासा केला आहे. जे ऐकून प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडेल. ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून नफीसनं मनप्रीतला खूप बिअर पाजली. त्यानंतर नशेच्या अवस्थेत पहिल्यांदा तिच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला त्यानंतर लाथ मारून ट्रकच्या बाहेर फेकले आणि शेवटी मनप्रीतच्या अखेरच्या श्वासापर्यंत नफीसनं ट्रकच्या चाकाखाली तिला चिरडलं.

पोलिसांनी या घटनेनंतर नफीसला अटक केली आहे. चौकशीत त्याने हत्येची धक्कादायक कबुली दिली आहे. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला जेलमध्ये पाठवलं आहे. सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले की, नॅशनल हायवे ७४ वर जिकरी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत आढळला होता. ही महिला मनप्रीत कौर असून उत्तराखंडच्या भीकमपुरी येथील सुखबीर सिंग यांची पत्नी असल्याचं समोर आलं. मनप्रीतच्या पतीने नफीस अहमदचा पुत्र जमीर अहमदविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर नफीस अहमद या पोलिसांनी अटक केली.

नफीस अहमदकडून पोलिसांनी मृत महिलेचं आधार कार्ड, मोबाईल आणि हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉड आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे. चौकशीत आरोपीनं कबुल केले की, मनप्रीतसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. ती माझ्यासोबत राहण्याचा हट्ट करत होती. इतकंच नाही तर जर मी सोबत राहिलो नाहीतर खोट्या गुन्ह्यात तुला अडकवेन अशी धमकी दिली होती असं त्याने पोलिसांना सांगितले. मनप्रीतच्या या धमकीला वैतागून नफीसनं तिचा काटा काढण्याचं ठरवलं. मनप्रीतला काशीपूरला सोडण्याच्या बहाण्याने तो ट्रकमधून घेऊन गेला. त्यानंतर मनप्रीतला ट्रकमध्येच बिअर पाजली. नशेच्या अवस्थेत दोघांमध्ये भांडण झालं. तेव्हा लोखंडी रॉडनं मनप्रीतवर हल्ला केला. त्यानंतर तिला लाथ मारून ट्रकच्या खाली ढकललं आणि हत्येला रस्ते अपघात दाखवण्यासाठी नफीसनं मनप्रीतचा मृतदेह तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत चाकाखाली चिरडला.

असा आहे प्रकार?

पतीपासून वेगळं राहिल्यानंतर मनप्रीतची भेट २०१८ मध्ये काशीपूरमधील कपड्याचं दुकान असलेल्या नफीससोबत झाली. नफीसने तिला मोबाईल नंबर दिला. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंध सुरु झाले. मनप्रीत वारंवार नफीसला सोबत राहण्याचा हट्ट करू लागली. ज्यानंतर नफीसनं १ वर्षाने तिचं लग्न जवळच्या एका व्यक्तीसोबत केले. परंतु १० दिवसांनी मनप्रीत पुन्हा नफीसकडे आली. त्यानंतर एकदा फोनवरुन बोलता बोलता ती रात्री १० वाजता काशीपूरला परतण्याची मागणी करू लागली. त्यानंतर नफीस तिला काशीपूरला घेऊन जाण्यासाठी ट्रकने नेतो. ट्रकच्या केबिनमध्ये लोखंडी रॉडवर रक्त आढळल्याने पोलिसांना संशय आला. ट्रकाच्या डाव्याबाजूस खिडकीवर आणि चाकांवर रक्त आढळलं. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मारेकऱ्याला अटक केली.

टॅग्स :Policeपोलिस