शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"मुलाकडून चूक, एन्काऊंटर नको"; सुनील पाल अपहरणातील आरोपीसह पोलीस ठाण्यात आली आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 18:11 IST

कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणात सामील असलेल्या गँगचा सदस्य शुभम आपल्या आईसह बिजनौर पोलीस ठाण्यात पोहोचला.

बिजनौरमध्ये यूपी पोलिसांच्या सततच्या एन्काऊंटरमुळे गुन्हेगारांमध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की, ते स्वत:ला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण करत आहेत. चित्रपट अभिनेता मुस्ताक खान आणि कॉमेडियन सुनील पाल यांच्या अपहरणात सामील असलेल्या गँगचा सदस्य शुभम आपल्या आईसह बिजनौर पोलीस ठाण्यात पोहोचला.

शुभमवर ५० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं असून पोलीस गेल्या २२ दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. एन्काऊंटरच्या भीतीने त्याने आईसोबत पोलीस ठाणे गाठलं. शुभमच्या आईने अश्रू ढाळत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे आपल्या मुलाची जीव वाचवण्याची विनंती केली. शुभमच्या आईने सांगितलं की, माझ्या मुलाकडून चूक झाली, त्याला माफ करा, पण त्याचा एन्काऊंटर करू नका.

अलीकडेच गँगमधील इतर सदस्य लवी पाल, आकाश उर्फ ​​गोला आणि अर्जुन कर्णवाल यांना चकमकीनंतर अटक करण्यात आली होती. शुभमच्या आईच्या आवाहनानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी बिजनौर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

या प्रकरणी एसपी सिटी संजीव वाजपेयी यांनी सांगितलं की, मेरठमधील चित्रपट अभिनेता मुस्ताक खान आणि कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण केल्याप्रकरणी शुभमचं नाव आहे. मेरठ आणि बिजनौर पोलीस त्याचा शोध घेत होते. मेरठमध्ये शुभमवर २५ हजार आणि बिजनौरमध्ये २५ हजारचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. बुधवारी तो स्वत: पोलीस ठाण्यात आला आणि आत्मसमर्पण केलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. 

कॉमेडियन सुनील पाल आणि चित्रपट अभिनेता मुस्ताक खान यांचं अपहरण करणाऱ्या गँगमध्ये एकूण १० जण सामील होते. यामध्ये बिजनौर पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून दोन जणांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. लवी आणि आकाश उर्फ ​​गोलाच्या पायाला गोळी लागली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSunil Palसुनील पालPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश