शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरता! पहाटे शौचालयासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर गँगरेप करून विजेच्या खांबाला लटकवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 08:44 IST

कुटुंबाच्या माहितीनुसार, चकहबीब गावातील एक महिला पहाटे शौचालयासाठी घरातून बाहेर पडली होती.

ठळक मुद्देआरोपींनी तिला बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाकाही तासानंतर जेव्हा गावातील लोक शेतात निघाले असता त्यांना महिला बेशुद्ध अवस्थेत विजेच्या खांबाला लटकलेली दिसली.पीडित महिलेच्या घरी लग्नाचा समारंभ होता. त्यामुळे मंडप आणि इतर कामांसाठी तिथे मजूरही आले होते.

समस्तीपूर – बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका गावात शौचालयासाठी बाहेर गेलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. इतकचं नाही तर या प्रकारानंतर अज्ञातांनी बेशुद्ध पडलेल्या महिलेला नग्नवस्थेत विजेच्या खांबाला लटकवून फरार झालेत. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस गावात दाखल झाले. या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

कुटुंबाच्या माहितीनुसार, चकहबीब गावातील एक महिला पहाटे शौचालयासाठी घरातून बाहेर पडली होती. त्यावेळी निर्जनस्थळी काही अज्ञातांनी या महिलेले एकटं गाठलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. महिलेने याचा विरोध केला असता आरोपींनी तिला बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या क्रूर प्रकारानंतर आरोपींनी या महिलेला नग्न अवस्थेत विजेच्या खांब्याला दोरीनं लटकवलं. महिलेचा मृत्यू झाल्याचं समजून ते तिथून फरार झाले.

काही तासानंतर जेव्हा गावातील लोक शेतात निघाले असता त्यांना महिला बेशुद्ध अवस्थेत विजेच्या खांबाला लटकलेली दिसली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देताच ते घटनास्थळी पोहचले. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या ही महिला मृत्यूशी झुंज देत आहे. पीडित महिलेच्या घरी लग्नाचा समारंभ होता. त्यामुळे मंडप आणि इतर कामांसाठी तिथे मजूरही आले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा ही महिला घराबाहेर पडली तेव्हा काही मजुरांनी तिचा पाठलाग केला. या महिलेला चहुबाजूने घेरलं त्यानंतर महिलेचे सोने आणि कपडे काढून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संशय पोलिसांना आहे.

रागाच्या भरात गावकऱ्यांनी ७ जणांना बांधून ठेवलं

महिलेसोबत घडलेला क्रूर प्रकार पाहून संतापलेल्या लोकांनी संशयाच्या आधारे मंडप उभारणाऱ्या ७ मजुरांना डांबून ठेवलं. घटनेच्या माहितीनंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या सर्वांची कसून चौकशी करत आहेत.

पीडिता बोलण्याच्या स्थितीत नाही

सध्या पीडित महिलेची तब्येत इतकी गंभीर असून ती पोलिसांना काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नाही. महिला पोलीस अधिकारी पुष्पलता कुमारी यांनी सांगितले की, लग्नाच्या समारंभानंतर जेव्हा पहाटे ही महिला शौचालयासाठी गेली तेव्हा काही जणांनी तिच्यावर अत्याचार केले. नेमकं काय घडलं हे पीडित महिलेच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून ७ संशयितांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहार