संतापजनक! तीन महिलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:26 IST2020-05-05T13:03:56+5:302020-05-05T17:26:22+5:30
मुजफ्फरपूरमधील डकरामा गावात तीन महिलांना गावातील लोकांनी मारहाण केली.

संतापजनक! तीन महिलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुजफ्फरपूर : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील मुजफ्फरपूरमधील एका गावात तीन महिलांना जमावाने विवस्त्र करून मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मुजफ्फरपूरमधील डकरामा गावात तीन महिलांना गावातील लोकांनी मारहाण केली. तसेच, मारहाण केल्यानंतर या महिलांना विवस्त्र करून त्यांची गावात धिंड काढली. ही घटना अतिशय निंदनीय व धक्कादायक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तीन महिलांवर काळी जादू करत असल्याचा आरोप गावातील लोकांनी केला आहे. तसेच, गावातील लोक त्यांना 'डायन' असे म्हणत होते. ज्यावेळी या महिलांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी अनेक लोक व्हिडीओ काढत होते. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली.
oBihar: After a viral video emerges showing 3 women being beaten up & being paraded half-naked in Dakrama village in Muzaffarpur, SDO, East Muzaffarpur Kundan Kumar says, "This is a crime. The police after a thorough investigation will take an action against the accused". pic.twitter.com/RLBP602iIH
— ANI (@ANI) May 5, 2020
दरम्यान, तीन महिलांना विवस्त्र करून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची चौकशी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. याबाबत मुजफ्फरपूरचे पोलीस अधिकारी कुंदन कुमार यांनी सांगितले की, "हा गुन्हा आहे. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहे. जे कोणी दोषी असतील, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल."