SBIच्या शाखेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा; लाखो रुपयांची लूट करुन दरोडेखोरांचा पोबारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 19:21 IST2021-07-08T19:19:20+5:302021-07-08T19:21:12+5:30
बिहारच्या मुझफ्फरापूरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) रेपुरा बाजार शाखेत ६ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून ७ लाखांची लूट केल्याची घटना घडली आहे.

SBIच्या शाखेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा; लाखो रुपयांची लूट करुन दरोडेखोरांचा पोबारा
बिहारच्या मुझफ्फरापूरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) रेपुरा बाजार शाखेत ६ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून ७ लाखांची लूट केल्याची घटना घडली आहे. बँकेचे कर्मचारी आणि ग्राहकांच्या डोळ्यासमोरच हवेत फायरिंग करुन दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोडेखोर मोटारसायकलवरुन आले होते आणि त्यांनी हेल्मेट व मास्क परिधान केला होता. पोलिसांनी घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
बँकेच्या कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांनी कॅश काऊंटरवरुन ६ लाख ८० हजार रुपये लुटले. स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा पडल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि गर्दी जमली. काही जणांनी दरोडेखोरांना पकडण्याचाही प्रयत्न केला. पण दरोडेखोरांच्या हातात बंदुक असल्यानं त्यांनी हवेत फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते हाती लागलेली रक्कम घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, दरोड्यावेळी काही जणांनी आपल्या मोबाइलमध्येही याचं व्हिडिओ शूटिंग केलं आहे. यात दरोडेखोर हवेत फायरिंग करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.