बापाच्या वासनेला बळी पडली अल्पवयीन मुलगी; ट्रेनमध्ये बाळाला जन्म देऊन सोडलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:32 IST2025-07-08T18:59:55+5:302025-07-08T19:32:51+5:30

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Bihar Minor girl who became a victim of her father lust became a mother in a moving train | बापाच्या वासनेला बळी पडली अल्पवयीन मुलगी; ट्रेनमध्ये बाळाला जन्म देऊन सोडलं, पण...

बापाच्या वासनेला बळी पडली अल्पवयीन मुलगी; ट्रेनमध्ये बाळाला जन्म देऊन सोडलं, पण...

Bihar Chapra Rape Case:बिहारमधील छपरा जिल्ह्यातून बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये एका नराधम बापाने स्वतःच्या मुलीला वासनेचा बळी बनवले. दारूच्या नशेत बुडलेल्या या राक्षसाने त्याच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यावर संपूर्ण कुटुंबाने मिळून तिला आणखी लज्जास्पद वागणूक दिली. कुटुंबाने नवजात बाळाला उत्तर प्रदेशातील मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं. मात्र एका चुकीमुळे हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

उत्तर प्रदेशात ट्रेनमध्ये एका बॅगेत सापडलेल्या एका नवजात बाळामुळे एका मोठ्या गुन्ह्याची उकल झाली. बाळासोबत असलेल्या बॅगेत सापडलेल्या सिम कार्डमुळे पोलिसांना बाळाचे कुटुंबिय सापडले. तपासादरम्यान, अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर हे बाळ जन्माला आल्याचे कळताच पोलिसांनाही धक्का बसला. २२ जून रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद स्टेशनवर ही बॅग सापडली होती. बाळाला तपासणीसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते.

२२ जूनच्या रात्री बरेली स्टेशनवर टीटीईला ट्रेनच्या एका डब्यात ठेवलेल्या बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मुरादाबादला पोहोचताच, टीटीईने ताबडतोब बाळाला चाइल्डलाइनकडे सोपवले. त्याच रात्री बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पोलिसांनी त्याच्या पालकांचा शोध सुरू केला. रेल्वे पोलिसांच्या तपासात नवजात बाळाला जन्म देणारी आई स्वतः अल्पवयीन असून तिच्या वडिलांना केलेल्या अत्याचाराने हे बाळ जन्माला आले.

बिहारमधील छपरा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या कुटुंबातील नराधम बाप त्याच्या मुलीचे लैंगिक शोषण करत राहिला. मात्र काही दिवसांनी ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे कुटुंबाने गर्भवती अल्पवयीन मुलीला प्रसूतीसाठी दिल्लीला घेऊन जाण्याचे ठरवले. पण ट्रेन वाराणसीला पोहोचताच तिने ट्रेनच्या शौचालयात बाळाला जन्म दिला. यानंतर घाबरलेल्या बापाने बाळाला एका बॅगमध्ये टाकलं आणि ती तिथेच सोडून दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिचे वडील पळून गेले.

तपासादरम्यान, बॅगेत सापडलेल्या सिमकार्डवरून पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा हाती लागला. हे सिमकार्ड अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकाच्या नावावर होते. त्यानंतर पोलीस मुलीच्या घरी पोहोचले. पोलिसांनी पीडितेला कोर्टात हजर केल्यानंतर तिने तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याचे उघड केले. 
 

Web Title: Bihar Minor girl who became a victim of her father lust became a mother in a moving train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.