बाबो! 3 मुलांची आई तरुणाच्या प्रेमात पडली; लग्नासाठी गावकऱ्यांसमोर अडून बसली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 12:06 IST2022-07-26T11:58:32+5:302022-07-26T12:06:52+5:30
प्रियकर-प्रेयसीला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना बांधून बेदम मारहाण केली. महिलेचे या तरुणासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते, असे सांगण्यात येत आहे.

फोटो - news18 hindi
नवी दिल्ली - प्रेमाचे भन्नाट किस्से हे आपण नेहमीच ऐकत असतो. कोण कधी, कुठे, कसं कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. बिहारच्या बांकामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 मुलांची आई असलेली विवाहित महिला एका तरुणाच्या प्रेमात पडली. एके दिवशी महिलेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी पोहोचला, त्याचवेळी गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. यानंतर यानंतर या दोघांसोबत असं काही केलं गेलं ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर-प्रेयसीला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना बांधून बेदम मारहाण केली. महिलेचे या तरुणासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते, असे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण बांका जिल्ह्यातील धोरैया पोलीस स्टेशन हद्दीतील बत्सर गावातील आहे. गावातील रहिवासी असलेला रुदल कुमार रात्रीच्या अंधारात गुपचूपपणे भागलूपर जिल्ह्यातील सन्हौला पोलीस ठाण्यांतर्गत करहरिया गावात पोहोचला होता. गावकऱ्यांनी प्रियकराला पकडून दोघांना झाडाला बांधून बेदम मारहाण केली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले दोघांनाही यानंतर पोलीस ठाण्यात नेले, तेथे दोघांच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली आणि संमतीनंतर सन्हौला पोलीस ठाण्याच्या सूचनेवरून बटसार पंचायतीचे सरपंच भरोषी मंडल यांच्या देखरेखीखाली प्रियकर व प्रेयसीचा शीतला मंदिरात विवाह झाला. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती परराज्यात मजुरीचे काम करतो. या दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती गावकऱ्यांना लागल्याने त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडलं. सोमवारी रात्री उशीरा काही ग्रामस्थांनी दोघांनाही पकडलं. लग्नानंतर महिला दुसऱ्या पतीसोबत सासरच्या घरी गेली, तर तीन मुले आजोबांकडेच राहिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.