शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 17:36 IST

Sushant Singh Rajput : भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत.

नवी दिल्ली - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  (Sushant Singh Rajput) आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार सिंह आणि त्यांचे साथीदार असलेल्या अमीर हसन यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह यांचं मधेपुरा येथे मोटारसायकल शोरूम आहे. मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात राजकुमार सहीत त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये सहकारी अमीर हसनची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली  आहे.

राजकुमार सिंह मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गाडीला ओव्हर टेक करत गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सुशांतच्या निधनाला काही महिने होऊन गेल्यानंतर आता त्याची एक नोट तुफान व्हायरल होत आहे. "आयुष्यातील 30 वर्षे काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात घालवली पण नंतर कळलं खेळच चुकीचा आहे" अशा आशयाची सुशांतची नोट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सुशांतची बहीण श्वेतासिंह कीर्ती नेहमीच त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने सुशांतने स्वतः लिहिलेली एक नोट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. 

"काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात 30 वर्षे घालवली पण नंतर कळलं खेळच चुकीचा"; सुशांतची "ती" नोट व्हायरल

"मला वाटतं की मी माझ्या आयुष्यातील पहिली 30 वर्षे काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात घालवली. मला अनेक गोष्टींमध्ये चांगलं व्हायचं होतं. मला टेनिस, शिक्षण आणि ग्रेडमध्ये चांगलं व्हायचं होतं आणि मी सर्व गोष्टींकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिलं. मी जसा आहे तसा मी समाधानी नाही. मात्र या सर्व गोष्टींमध्ये मी सर्वोत्कृष्ट होऊ शकलो तर... मला वाटतं मी चुकीच्या पद्धतीने गोष्टी हाताळत होतो. कारण मी आधीपासून काय आहे याचा शोध मला सर्वातआधी घ्यायला हवा होता" असं सुशांतने आपल्या नोटमध्ये म्हटलं आहे. सुशांतच्या या नोटने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून अवघ्या काही मिनिटांत ती व्हायरल झाली आहे. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंगPoliceपोलिसFiringगोळीबारhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी