मुंबई - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  (Sushant Singh Rajput) आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या निधनाला काही महिने होऊन गेल्यानंतर आता त्याची एक नोट तुफान व्हायरल होत आहे. "आयुष्यातील 30 वर्षे काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात घालवली पण नंतर कळलं खेळच चुकीचा आहे" अशा आशयाची सुशांतची नोट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सुशांतची बहीण श्वेतासिंह कीर्ती नेहमीच त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने सुशांतने स्वतः लिहिलेली एक नोट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. 

"मला वाटतं की मी माझ्या आयुष्यातील पहिली 30 वर्षे काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात घालवली. मला अनेक गोष्टींमध्ये चांगलं व्हायचं होतं. मला टेनिस, शिक्षण आणि ग्रेडमध्ये चांगलं व्हायचं होतं आणि मी सर्व गोष्टींकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिलं. मी जसा आहे तसा मी समाधानी नाही. मात्र या सर्व गोष्टींमध्ये मी सर्वोत्कृष्ट होऊ शकलो तर... मला वाटतं मी चुकीच्या पद्धतीने गोष्टी हाताळत होतो. कारण मी आधीपासून काय आहे याचा शोध मला सर्वातआधी घ्यायला हवा होता" असं सुशांतने आपल्या नोटमध्ये म्हटलं आहे. सुशांतच्या या नोटने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून अवघ्या काही मिनिटांत ती व्हायरल झाली आहे. 

सुशांत सिंग राजपूतच्या डॉग फजचा नवीन व्हिडीओ आला समोर

सुशांत सिंग राजपूतची भाची मल्लिका सिंग नेहमी इंस्टाग्रामवर सुशांतचे न पाहिलेले आणि जुने फोटो शेअर करत करत असते. मामाच्या आठवणींना उजाळा देत असते. नुकताच तिने फजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो पाहून चाहते इमोशनल झाले आहेत. इन्स्टा स्टोरीवर मल्लिका सिंगने मामा सुशांत सिंग राजपूतचा पाळीव कुत्रा फजचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो लॉनवर चालताना दिसतो आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर फजला त्यांच्या पटना येथील घरी नेण्यात आले. तिथे तो सुशांतच्या वडिलांसोबत वेळ व्यतित करताना नेहमी दिसतो. सुशांतच्या निधनाला आता सात महिने होत आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी मल्लिका सिंगने आपल्या बालपणीचा जुना फोटो शेअर करत कॅप्शन दिले होते की, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, माझे गुलशन मामा. मला तुमची खूप आठवण येते. सुशांत सिंग राजपूतने 14 जून, 2020 रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला. त्याच्या मृत्यूनंतर घरातले आणि चाहत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput wrote life game in note says i spent 30 years of life to become something

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.