पत्नीचं भावोजीसोबत सुरू होतं अफेअर, वैतागून नाराज पतीने उचललं धक्कादायक पाउल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:21 IST2021-08-25T13:19:28+5:302021-08-25T13:21:06+5:30
परिवाराने सूचना दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

पत्नीचं भावोजीसोबत सुरू होतं अफेअर, वैतागून नाराज पतीने उचललं धक्कादायक पाउल
पटणा येथे पत्नीच्या अनैतिक संबंधाना वैतागून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे आणि त्रास दिल्यामुळे घडली आहे. रोजच्या भांडणामुळे वैतागलेल्या पतीने निराश होऊन अखेर गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवलं. परिवाराने सूचना दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी मृतकाची सुसाइड नोटही सापडली आहे. ज्यात मृतकाने आत्महत्येसाठी पत्नी सोनी देवी आणि तिचा भावोजी संजय कुमार यांना थेट जबाबदार असल्याचं सांगितलं. अविनाश राज असं मृत व्यक्ती नाव आहे. घटनेबाबत मृतकाची बहीण सुनीता देवीने सांगितलं की, पती-पत्नीमध्ये चांगले संबंध नव्हते. अलिकडे त्यांच्या सतत भांडणं होत होती. मृतकाची पत्नी सोनी देवीचं तिचा भावोजी संजय कुमार यांच्यासोबत अफेअर सुरू होतं. ज्यावरून अविनाश पत्नीला बोलत होता. (हे पण वाचा : मुलीसमोरच बॉयफ्रेन्डने केली आईची हत्या, मग मृतदेह सूटकेसमध्ये भरून....)
ती म्हणाली की, मंगळवारी रात्री उशारी पती-पत्नीत भांडण झालं. त्यानंतर सोनी देवीने बहीण आणि भावोजीला घरी बोलवून अविनाशचा अपमान केला होता. सोबतच पोलिसांना बोलवून अटक करण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणावर पोलीस अधिकारी राहुल ठाकूर म्हणाले की, लवकरच पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.