शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीने व्हिडीओ कॉल करून काढले अंगावरचे सगळे कपडे, मग सुरू झाला धक्कादायक खेळ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 11:52 IST

तरूणाला हे माहीत नव्हतं की, हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड होत आहे. नंतर तरूणाने व्हिडीओ कॉल कट केला. पण तिथूनच त्याच्या ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला.

पटनातील (Patna) एका भागातील विमा एजंटला फोनवर एक व्हिडीओ कॉल आला. तरूणाने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला. दुसऱ्या स्क्रीनवर एक तरूणी होती. काही वेळातच हसत हसत तिने तिचे कपडे उतरवायला सुरूवात केली. एक एक करून तिने अंगावरील सगळे कपडे काढले आणि ती निर्वस्त्र झाली. तरूणाला हे माहीत नव्हतं की, हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड होत आहे. नंतर तरूणाने व्हिडीओ कॉल कट केला. पण तिथूनच त्याच्या ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला.

ही घटना पटनाजवळील दानापूरची आहे. सोमवारी ही घटना घडली. यात दानापूरचा राहणारा एक विमा एजंट तरूणीचा शिकार झाला. पीडित तरूणाने यासंबंधी पटना सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याला एका तरूणीने कॉल केला होता. आणि सांगितलं की, तिच्या परिवाराला हेल्थ आणि टर्म इन्श्यूरन्स प्लान घ्यायचा आहे. नंतर तरूणीने आपल्या परिवाराचे डिटेल्स पाठवण्यासाठी एजंटचा व्हॉट्सअॅप नंबर घेतला. 

तरूणानेही लगेच नंबर दिला. नंतर त्या तरूणीने तरूणाला व्हिडीओ कॉल केला. कॉल रिसीव केल्यावर तरूणीने एक एक करून अंगावरील सगळे काढले. त्यानंतर तरूणी विमा एजंटसोबत अश्लील भाषेत बोलू लागली होती. थोड्या वेळाने तरूणाने कॉल कट केला. त्याला जराही अंदाज नव्हता की, तरूणी त्याच्यासोबत काय करणार आहे.

कॉल कट केल्यावर काही वेळाने विमा एजंट तरूणाला मोबाइलवर व्हिडीओ कॉलच्या स्क्रीन शॉट्सचे अनेक फोटो आले. ज्यात तरूणी नग्न अवस्थेत विमा एजंटसोबत बोलत आहे. स्क्रीनशॉटचे अनेक छोटे व्हिडीओ पाहिल्यावर तरूणाला धक्का बसला. थोड्यावेळाने तरूणीने विमा एजंटकडे ५० हजार रूपयांची मागणी केली.

मात्र, विमा एजंटने पैसे देण्यास नकार दिला. तरूणीने पुन्हा त्याला फोन केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धकमी दिली. विमा एजंटने नकार दिल्यावर तरूणीने सहकारी क्राइम ऑफिसर आणि अधिकारी बनून तरूणाला फोन करू लागले होते. त्यांनीही तरूणाला धमकी दिली. त्यांनीही तरूणाकडे पैशांची मागणी केली.

फोन करणाऱ्याने विमा एजंटला सांगितलं की, त्याने दिल्लीतील सायबर सेलमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्याने लवकरात लवकर तरूणीसोबत सेटलमेंट करून घ्यावी. नाही तर दिल्ली पोलीस येऊन तुला अटक करतील. तरीही विमा एजंटने काही ऐकलं नाही. त्यानंतर तरूणीने विमा एजंटला आपला अकाऊंट नंबर पाठवला. लगेच पैसे टाकण्यास सांगितलं.

त्यानंतरही तरूणी आणि तिच्या गॅंगच्या लोकांनी तरूणाला अनेकदा फोन केले. पण तरूण काही पैसे द्यायला तयार नव्हता. कंटाळून तरूणाने पटना सायबर सेलमध्ये तरूणी आणि तिच्या गॅंग विरोधात तक्रार दाखल केली. आता पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम