धक्कादायक! महिलेची गळा चिरून हत्या, पती म्हणाला - 'अनेक तरूणांसोबत होते तिचे संबंध'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 12:57 IST2022-04-13T12:54:03+5:302022-04-13T12:57:01+5:30

Bihar Crime News : महिलेचा मृतदेह आढळून आल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि पुढील चौकशी सुरू केली.

Bihar Crime News : Husband killed his wife over illicit relations with many boys | धक्कादायक! महिलेची गळा चिरून हत्या, पती म्हणाला - 'अनेक तरूणांसोबत होते तिचे संबंध'

धक्कादायक! महिलेची गळा चिरून हत्या, पती म्हणाला - 'अनेक तरूणांसोबत होते तिचे संबंध'

Bihar Crime News : बिहारच्या भागलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेचा मृतदेह कुप्पा घाट पुलाखाली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महिलेची गळा चिरून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. महिलेच्या पतीने आरोप केला की, त्याच्या पत्नीचे अनेक तरूणांसोबत अनैतिक संबंध होते.

महिलेचा मृतदेह आढळून आल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि पुढील चौकशी सुरू केली. पोलिसांनुसार मृत महिला सुल्तानगंजमध्ये राहणाऱ्या कैलाश साहची पत्नी जुली कुमारी आहे. महिलेच्या कुटुंबियांनी कैलाश साहवर तिच्या हत्येचा आरोप लावला होता. तेच कैलाश साह म्हणाला की, त्याच्या पत्नीचे अनेक तरूणांसोबत प्रेम संबंध होते. ती एकाचवेळी अनेक तरूणांच्या संपर्कात होती. ती सतत तरूणांसोबत बोलत होती आणि मनाई करूनही घरातून निघून जात होती. अनेक दिवस ती घरी परत येत नव्हती आणि परत आल्यावर माझ्याशी बोलतही नव्हती.

कुटुंबियांनी सांगितलं की, घटनेच्या दिवशी जुलीच्या मोबाइलवर एक कॉल आला होता. यानंतर ती घरातून बाहेर गेली आणि रात्रभर घरी परत आली नाही. सकाळी जेव्हा कुटुंबियांनी पाहिलं तर तिचा गळा कापलेला मृतदेह पुलाखाली आढळून आला.

कुटुंबियांनुसार, सात वर्षाआधी जुलीचं लग्न सुल्तानगंजच्या कैलाश साहसोबत झालं होतं. लग्नानंतर जुली पतीसोबत तिच्या माहेरीच राहत होती. मृत महिलेचा मुलगा ऋषीने पोलिसांना सांगितलं की 'आई-बाबा रात्री उशीरापर्यंत दारू प्यायले. त्यानंतर आई आणखी दारू आणण्यासाठी घरातून बाहेर गेली'. स्थानिक पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि महिलेचे कॉल डिटेल्सही बघत आहेत.

Web Title: Bihar Crime News : Husband killed his wife over illicit relations with many boys