'माझा पती काहीच करत नाही'! महिलेने आरोप करून सोडलं घर आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 15:57 IST2022-09-17T15:56:58+5:302022-09-17T15:57:15+5:30
Crime News : महिला पोलीस स्टेशनच्या सीआय सुखाराम चोटिया यांनी सांगितलं की, विवाहित महिलेने तक्रार दाखल केली की, तिचं लग्न 21 ऑक्टोबर 2021 मध्ये भीलवाडाच्या एका तरूणासोबत हिंदू रितीरिवाजाने झालं होतं.

'माझा पती काहीच करत नाही'! महिलेने आरोप करून सोडलं घर आणि मग....
Crime News : बिहारच्या (Bihar) चुरू शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वार्ड नंबर 55 च्या एका विवाहित महिलेने तिच्या पतीवर नपुंसक असल्याचा आरोप केला आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. महिला पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या नियमानुसार तक्रार दाखल करत चौकशी सुरू केली.
महिला पोलीस स्टेशनच्या सीआय सुखाराम चोटिया यांनी सांगितलं की, विवाहित महिलेने तक्रार दाखल केली की, तिचं लग्न 21 ऑक्टोबर 2021 मध्ये भीलवाडाच्या एका तरूणासोबत हिंदू रितीरिवाजाने झालं होतं. साखरपुड्यावेळी तिच्या वडिलांनी वराकडील लोकांना सोन्या-चादींच्या दागिन्यांसोबत 2 लाख 51 हजार रूपये दिले होते. 18 ऑक्टोबरला तिचं लग्न भीलवाडामध्येच झालं होतं. लग्नानंतर पतीने जेव्हा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तेव्हा तिला संशय आला. पण संशय असूनही तिने ना माहेरी कुणाला सांगितलं ना सासरच्या लोकांना सांगितलं.
महिलेने आरोप केला की, तिच्या सासरच्या लोकांना तिचा पती नपुंसक असल्याचं माहीत असूनही त्यांनी षडयंत्र रचून तिचं लग्न लावून दिलं. याबाबत काही दिवसांनी जेव्हा तिने सासूला सांगितलं तेव्हा सासूने सासरच्या लोकांसोबत मिळून तिला मारहाण केली. तिला शिव्याही दिल्या. तेव्हापासूनच विवाहित महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू झाला होता.
यानंतर पीडित महिलेने आपल्या वडिलांना सगळं प्रकरण सांगितलं. 9 मे 2022 ला तिचे वडील पीडित महिलेला सासरी घेण्यासाठी गेले तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिला जबरदस्ती रूममध्ये बंद केलं आणि त्यांच्या विरोधातील तक्रार परत घेण्याच्या अटीवर तिला घरी परत पाठवण्यासाठी तयार झाले.
महिलेने पतीसहीत सासरच्या लोकांवर आरोप केला की, तिने सांगितलं की, स्त्री धन परत न देताच दिला पाठवण्यात आलं. महिलेने पतीसह सासरच्या 9 लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस प्रकरणाची चौकशी करत असून लवकरच प्रकरणाचा छडा लावला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.