बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांची पुन्हा हायकोर्टात याचिका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 20:53 IST2019-07-24T20:49:50+5:302019-07-24T20:53:48+5:30

साताऱ्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी बिचुकलेंची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.   

Bigg Boss Fame Abhijeet Bichukale filed petition in high court to quash case registered in satara | बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांची पुन्हा हायकोर्टात याचिका  

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांची पुन्हा हायकोर्टात याचिका  

ठळक मुद्देमुंबई हायकोर्टाने खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. आता पुन्हा अभिजित बिचुकले यांनी हायकोर्टात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. 

मुंबई - बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. साताऱ्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी बिचुकलेंची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.   

बिग बॉस मराठी सीझन २ मधून घराघरात पोहचलेले अभिजीत बिचुकलेचेचाहते ते बिग बॉसच्या घरात कधी परतणार, याची वाट पाहत आहेत. तो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून बिग बॉसच्या घरात पुन्हा येणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र,अभिजीत बिचुकलेलाला न्यायालयाकडून काही दिलासा मिळालेला नाही. मुंबई हायकोर्टाने खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस तुरूंगातच रहावे लागणार आहे. त्यामुळे आता पुन्हा अभिजित बिचुकले यांनी हायकोर्टात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. 



Web Title: Bigg Boss Fame Abhijeet Bichukale filed petition in high court to quash case registered in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.