शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

Vinayak Mete Accident Update: विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अटक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:19 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ तीन महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. याबाबत ...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ तीन महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सीआयडीचा तपास पूर्ण झाला असून मेटेंच्या कारचा चालक हाच अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 

Road Hypnosis: विनायक मेटेंचा ड्रायव्हर रोड हिप्नॉटिझमचा शिकार? काय असतो हा प्रकारअपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला होता. चालकाने मेटेंना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप केला होता. चालक एकनाथ कदम याने रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत, असे म्हटले होते. 

आता हाच चालक दोषी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. विनायक मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदमवर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीआयडीने रसायनी पोलीस ठाण्यात ३०४ a, 304 -2 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

कदम हा मेटेंची कार १४०-१५० किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने उजव्या बाजुच्या लेनमध्ये गाडी घातली. परंतू तिथे आणखी एक गाडी ओव्हरटेक करत होती. ओव्हरटेक करता येणार नाही हे समजल्यावरही त्याने त्या लेनमधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेटेंची कार डाव्या बाजुने आदळली. सकृतदर्शनी कदम हाच मेटेंच्या अपघाती मृत्यूस आणि अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला लवकरच ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार आहे. गुन्ह्यात वापरलेल्या कलमांनुसार कदम याला दोन ते चार वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेAccidentअपघातPoliceपोलिस