शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! सुशील कुमारला कोर्टाने दिला दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 17:16 IST

Sushil Kumar anticipatory bail plea Rejected :सुनावणीदरम्यान सुशीलचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस त्याला कधीही अटक करू शकतात. 

ठळक मुद्देदिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या २३ वर्षीय सागर  धनखड  हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.

देशाला दोन ऑलिम्पिक पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्यावर दिल्लीपोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.  त्यातच  सुशील कुमारदिल्ली कोर्टात पोलिसांच्या अटकेपासून सरंक्षण मिळावं म्हणून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र सुनावणीदरम्यान सुशीलचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस त्याला कधीही अटक करू शकतात. 

 

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या २३ वर्षीय सागर  धनखड  हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. सुशीलकुमार विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं असून त्याची माहिती देणाऱ्यासाठी एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीत कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली आणि त्यात सुशील कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. त्या घटनेनंतर सुशील कुमार फरार झाला आहे आणि पोलिसांनी आता त्याची माहिती देणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. सुशीलसह या घटनेतील दुसरा आरोपी अजय याच्यावरही ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले आहे.  

 

हरिद्वारमध्ये एका मोठ्या योग गुरुच्या आश्रमात लपलाय सुशील कुमार

दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार सुशील हरिद्वार येथील मोठ्या योग गुरूच्या आश्रमात लपला आहे. दिल्ली पोलिसांना याबाबची माहिती मिळाली आहे. जागरणनं दिलेल्या माहितीनुसार रोहतक येथे राहणारा सुशीलचा जवळचा मित्रा भुरा यानं दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही सुशीलची काहिची प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुरा हा सुशीलच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तो सुशीलचा बिझनेस सांभाळत होता, परंतु काही वर्षांपूर्वी सुशीलनं त्याच्याकडून सर्व जबाबदारी काढून घेत, त्याला दूर केले. त्यानंतर ही जबाबदारी सुशीलनं अजय व भुपेंद्र यांच्याकडे सोपवली. भुपेंद्र हा फरिदाबाद येथे राहणार आहे आणि फरिदाबाद येथे त्याच्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

 

 

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारdelhiदिल्लीCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक