शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस पाठवणार समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 21:14 IST

Sameer Wankhede : वानखेडेंनी सादर केलेल्या पुराव्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करत काही प्रश्न विचारल्याचं कळत आहे. 

ठळक मुद्देएनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करत मुंबई पोलिसांत तक्रार केली होती.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे. मुंबईपोलिसांचा साधा वेशातील पोलीस पाळत ठेवत असल्याचा समीर वानखेडेंनी आरोप केला होता, त्यानंतर चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले आहे. 

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करत मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केल्याची माहिती मिळत आहे. अतिरिक्त आयुक्त दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहे. वानखेडेंनी सादर केलेल्या पुराव्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करत काही प्रश्न विचारल्याचं कळत आहे. 

सीसीटीव्हीमध्ये दिसणारे दोन्ही कॉन्स्टेबल ओशिवाराच्या डिटेक्शन विभागाचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दोन कर्मचाऱ्यांनाचे फोटो समोर आले आहे. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशीमध्ये दोन कर्मचाऱ्यांनी सांगितले की, हे फोटो कुठले आहे हे त्यांच्या लक्षात नाही. 

 

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गेल्या आठवड्यात मुंबईच्या खोल समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी (Cruise Rave Party) करताना पकडण्यात आले होते. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. (mumbai cruise rave party case)

एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली. महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांच्याकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली. ओशिवारा पोलिसांनी स्मशानात जात असताना समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. तेव्हा पासून ते या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे.  गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली.  

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेPoliceपोलिसMumbaiमुंबईcommissionerआयुक्तNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो