शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : नितेश राणेंना मोठा दणका; दोन दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:18 IST

Nitesh Rane remanded Police custody for 2 days : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे. 

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती आणि आज कणकवली न्यायालयासमोर नितेश राणे शरण आले आहेत. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता नितेश राणेंना दोन दिवस पोलीस कोठडीत रात्र काढावी लागणार आहे. आमदार नितेश राणे यांचा मुक्काम ओरोस जिल्हा पोलीस मुख्यालय येथे असणार आहे. चौकशीसाठी फक्त कणकवली पोलिस ठाण्यात आणतील. भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे.कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत आमदार नितेश राणेंसह अन्य संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहितीआमदार नितेश राणे यांची गाडी अडवल्यामुळे पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक बनत पोलिसांशी हुज्जत घातली. नितेश राणे हे स्थानिक आमदार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या अधिकाराखाली त्यांना अडवला आहात, असा सवालही त्यांनी पोलिसांना केला. मात्र, आज या प्रकरणात उलट चित्र पाहायला मिळत आहे. नितेश राणे यांचा उच्च न्यायालयासमोरील जामीन अर्ज एका निवेदनासह मागे घेण्यात आला आहे. या निवेदनात नितेश राणे पोलिसांच्या चौकशीला शरण जाणार असल्याची माहिती दिली होती. सुप्रीम कोर्टाकडून १० दिवसांचे अटकेपासून संरक्षण मिळाले होते. आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्गArrestअटक