लव्ह जिहाद प्रकरणी मोठी कारवाई, नव्या कायद्यानुसार यूपीमध्ये पहिली अटक

By पूनम अपराज | Published: December 3, 2020 06:28 PM2020-12-03T18:28:53+5:302020-12-03T18:29:20+5:30

Love Jihad : पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आरोपीचा तपास पोलिसांनी सुरू केला होता.

Big action in Love Jihad case, first arrest in UP under new law | लव्ह जिहाद प्रकरणी मोठी कारवाई, नव्या कायद्यानुसार यूपीमध्ये पहिली अटक

लव्ह जिहाद प्रकरणी मोठी कारवाई, नव्या कायद्यानुसार यूपीमध्ये पहिली अटक

Next
ठळक मुद्देधर्म परिवर्तन करण्यासाठी विद्यार्थिनीला भुरळ घालून आणि छेडछाड करून उवैश अहमद याने दबाव आणला आहे असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. विरोध केल्यानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांना आणि कुटूंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना शिवीगाळ केली गेली.

उत्तर प्रदेशमधील लव्ह जिहादविरोधातील कायद्यानंतर याप्रकरणी दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबर रोजी बेरेलीतील  देवरनिया या पोलिस ठाण्यात बेकायदेशीर  धर्म परिवर्तन अध्यादेशाला  राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. इतर समाजातील मुलीला आमिष दाखवून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप उमेश अहमद नावाच्या व्यक्तीवर करण्यात आला.

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आरोपीचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. देवरनिया भागातील खेड्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिस तक्रारीत म्हटले होते की, समय गावातील रफिक अहमद यांचा मुलगा उवैश अहमद याने शिकत असताना आपल्या मुलीशी  होती.

धर्म परिवर्तन करण्यासाठी विद्यार्थिनीला भुरळ घालून आणि छेडछाड करून उवैश अहमद याने दबाव आणला आहे असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. विरोध केल्यानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांना आणि कुटूंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना शिवीगाळ केली गेली. हे प्रकरण उघडकीस आलेले असल्याने पोलिस अटक टाळण्यासाठी आरोपी घरातून फरार होता. एका खबरीच्या माहितीवरून पोलिसांनी देवरिया रेल्वे फाटकातून आरोपीला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेच्या वडिलांची तक्रार गंभीरपणे घेतल्यानंतर आरोपीविरोधात उत्तर प्रदेश विधीविरुद्ध  विधधधर्म  धर्म संपर‍िवर्तन प्रत‍िषेध अध‍िन‍ियम आणि कलम 504, 506   अन्वये गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा तपास सुरू केला. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाईल. 

Web Title: Big action in Love Jihad case, first arrest in UP under new law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app