Big action! ED raids Omkar Group offices in mumbai | मोठी कारवाई! ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने केली छापेमारी  

मोठी कारवाई! ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने केली छापेमारी  

ठळक मुद्देआर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीचा भाग म्हणून शहरातील बांधकाम क्षेत्रीतील प्रसिद्ध कंपनी ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत.

मुंबई शहरातील प्रसिद्ध बिल्डर ओमकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओमकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओमकार ग्रुपच्या कार्यालयावर धाडी टाकली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीने अनेक राजकीय नेते, विकासकांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी सुरु केली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीचा भाग म्हणून शहरातील बांधकाम क्षेत्रीतील प्रसिद्ध कंपनी ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओमकार ग्रुपने काही बँकेकडून कर्ज घेतलेल आहे. या कर्जामध्ये तसेच अन्य काही पैशाच्या व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचा संशय ईडीला आला आहे. त्यामुळे ईडीने या ग्रुपच्या मुंबईतील विविध ठिकाणांवरील कार्यालयांवर छापे टाकले आहेत. ईडीने आतापर्यंत सायन येथील ओमकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट, नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग या ठिकाणी छापेमारी केली आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या वसईतील विवा ग्रुपवर धाड टाकल्यानंतर ईडीने ठाकूर यांचा पुतण्या मेहूल ठाकूरला २३ जानेवारीला अटक केली. तसेच मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही अटक केली. 

 

 

Web Title: Big action! ED raids Omkar Group offices in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.