नात्याला काळीमा! बाईक घेण्यासाठी दाम्पत्याने ६० हजारांत विकला ९ दिवसांचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:46 IST2024-12-29T15:45:46+5:302024-12-29T15:46:08+5:30
एका दाम्पत्यावर मयूरभंज जिल्ह्यातील संकुला गावातील एका दाम्पत्याला ६० हजार रुपयांना आपला ९ दिवसांचा मुलगा विकल्याचा आरोप आहे.

नात्याला काळीमा! बाईक घेण्यासाठी दाम्पत्याने ६० हजारांत विकला ९ दिवसांचा मुलगा
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बस्ता भागातील एका दाम्पत्यावर मयूरभंज जिल्ह्यातील संकुला गावातील एका दाम्पत्याला ६० हजार रुपयांना आपला ९ दिवसांचा मुलगा विकल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पैशातून या दाम्पत्याने बाईक खरेदी केली. मात्र दाम्पत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. गरिबी आणि मूल वाढवण्यास असमर्थ असल्यामुळे असं केल्याचं म्हटलं आहे.
माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत, पोलीस आणि बाल कल्याण समिती (CWC) च्या संयुक्त पथकाने शनिवारी बाळाला वाचवलं. त्याचवेळी मुलाला घेऊन गेलेल्या दाम्पत्याने एकही पैसे न देता मुलाला नेल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. मुलाच्या पालकांनीही पैसे मिळाले नसल्याचा दावा केला आहे.
हे बाळ ६० हजार रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातील काही रक्कम मुलाच्या वडिलांनी बाईक घेण्यासाठी वापरली. या दाव्यांचे खंडन करताना मुलाची आई शांती पात्रा म्हणाली की, मी मुलाला जन्म दिला आहे, परंतु गरिबीमुळे मी त्याला वाढवू शकत नाही.
आम्ही मूल नसलेल्या एका जोडप्याला आमचं बाळ दिलं आहे. मी माझ्या मुलाला विकलं नाही. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबीयांना बोलावलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.