रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:57 IST2025-09-19T10:56:51+5:302025-09-19T10:57:23+5:30
व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने या महिला घाबरतील आणि पोलिसांकडे तक्रार करणार नाहीत असं आरोपीची पत्नी चंद्रिकाला वाटत होते.

रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
भोपाळ - विधवा महिलांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपी अविनाश प्रजापतीला पोलिसांनी अटक केली. त्याने पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलांशी संबंध बनवणे आणि त्यांचे व्हिडिओ शूट करणे ही आयडिया त्याची पत्नी चंद्रिकाने दिल्याचा दावा आरोपीने चौकशीत केला आहे.
अविनाशची २ महिलांसोबत ओळख झाली होती. त्यातील एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत होती, दुसरी बँकेत कामाला होती. मेट्रोमोनियल साइटवरून अविनाशची या महिलांसोबत ओळख झाली. त्याने घटस्फोटित नवरा नावाने प्रोफाइल बनवले होते. या दोन्ही महिलांना अविनाशने लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यांच्यासोबत संबंध बनवले. हे सर्व प्लॅनिंग त्याची पत्नी चंद्रिकाचे होते. व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने या महिला घाबरतील आणि पोलिसांकडे तक्रार करणार नाहीत असं आरोपीची पत्नी चंद्रिकाला वाटत होते.
कार खरेदी करताना झाली ओळख
चंद्रिका पालीवाल नरसिंहगड येथे राहणारी होती. भोपाळच्या ऑटोमोबाइल कंपनीत ती सेल्स एक्जिक्यूटिव्ह म्हणून काम करत होती. एकेदिवशी अविनाश कार खरेदी करण्यासाठी तिथे आला. त्यानंतर या दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. पुढे मैत्री वाढली मग या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अविनाशला बिझनेसमध्ये तोटा होऊ लागला तेव्हा दोघांनी मिळून फसवणुकीचं काम सुरू केले. २०२३ पासून हे दोघे मेट्रोमोनियल साइटवर विधवा महिलांची फसवणूक करण्याचं काम करत आहेत. सध्या या प्रकरणी आरोपी अविनाशची पत्नी फरार आहे. विशेष म्हणजे चंद्रिका बुधनी विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढणाऱ्या मिर्ची बाबा यांची प्रस्तावक होती असा दावा पीडित विधवा महिलांनी निवेदनात केला आहे.
कोण आहेत अविनाश प्रजापती?
अविनाश प्रजापती मूळचा नरसिंहपूरचा असून तो दीड वर्षापासून भोपाळमध्ये राहतो. त्याचे वडील ग्रामसेवक होते. लोखंडी सळ्या विकण्याच्या नावाखाली, APP विकसित करण्याच्या आणि गुंतवणूक करण्याचे आश्वासन देऊन लोकांकडून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली अविनाशविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अविनाशची पोलीस कोठडी शनिवारी संपली. त्यानंतर बागसेवानिया पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.