शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बापरे! 2.17 कोटींची रोकड अन् 8 किलो सोन्याचं घबाड; क्लार्कची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 16:58 IST

CBI Raid FCI Clerk House Recovered More Than 2 Crore : क्लार्कच्या घरात तब्बल 2.17 कोटी रुपये, 8 किलो सोनं आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे.

नवी दिल्ली - भोपाळमध्ये भ्रष्टाचारच्या आरोपामध्ये एफसीआयच्या एका क्लार्कच्या घरावर छापा मारण्यात आला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) मध्ये क्लार्क असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या घरी मोठं घबाड सापडलं आहे. क्लार्कच्या घरात तब्बल 2.17 कोटी रुपये, 8 किलो सोनं आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. भ्रष्टाचार प्रकरणाच्या तक्रारी आल्यानंतर सीबीआयच्या एका टीमने ही कारवाई केली आहे. किशोर मीरा मीणा (Clerk Kishor Meena) असं या क्लार्कचं नाव आहे. तो छोला परिसरात राहत असून सीबीआयच्या कारवाई सुरू आहे. सीबीआयकडे मीणाविरोधात लाचेच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच त्याच्या घरातून भ्रष्टाचाराचे पुरावेही सापडले आहेत. 

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी एफसीआयच्या डिव्हिजनल मॅनेजरसह चौघांना अटक केली आहे. यातील तीन मॅनेजरच्या लाचेची रक्कम किशोर मीणा स्वत:कडेच ठेवत असल्याची माहितीही मिळाली आहे. गुडगाव येथील एका सेक्युरिटी एजन्सीने भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. त्यानंतर किशोर मीणासह तीन लोकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली. मीणा याची चौकशी केली असता लाचेची रक्कम तो घरीच ठेवत असल्याचं उघड झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, मीणा हा सुरुवातीला एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. 

बड्या अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचार करू लागल्याने त्याला क्लार्क करण्यात आलं होतं. सीबीआयने मीणाच्या घरातून 2.17 कोटी रुपये जप्त केले आहेत. सोबत नोटा मोजण्याची मशीनही जप्त केली आहे. त्यासोबतच 8 किलो सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. गुडगावच्या सेक्युरिटी कंपनीने सीबीआयकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. एफसीआयचे मॅनेजर दुसऱ्या कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करून उघडपणे लाच घेत आहेत, अशी तक्रार करण्यात आली होती. ही खबर मिळताच सीबीआयने जाळं पसरलं. सीबीआयने आरोपींना एका मंदिरात बोलावलं होतं. तिथं लाच घेताना आरोपींना रंगेहाथ पकण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :bhopal-pcभोपाळCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागBribe Caseलाच प्रकरणMONEYपैसा